काही सांगायचंय मला
काही सांगायचंय मला
काही सांगायचंय मला
काही सांगायचंय मला
माझ्या या माणसाला
माणूस ही एकच जात
तू जप मानवतेला.
काही सांगायचंय मला
माझ्या या माणसाला
तू जाणून घे विज्ञान
अन् सोड अंधश्रद्धेला.
काही सांगायचंय मला
माझ्या या माणसाला
तूच तूझा भाग्यविधाता
हे समजाव स्वत:ला.
काही सांगायचंय मला
माझ्या या माणसाला
तूझी वागणूक ठेव अशी
नको तडा विश्वासाला.
काही सांगायचंय मला
माझ्या या माणसाला
नको दुरावा नात्याला
नका दुखवू मनाला.

