STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Tragedy

4  

नासा ( NaSa ) येवतीकर

Tragedy

विश्वास

विश्वास

1 min
275

विश्वास तुझ्यावर ठेवून

केलो फार मोठी चूक

पश्चाताप करतो आत्ता

मिळत नाही बघ सुख


वाटले होते मिळेल 

माझ्या कष्टाला किंमत

घामाला मिळेना दाम

कशी भागेल माझी भूक


आज नाही तर उद्या

उगवेल चांगला दिवस

आशा ठेवलो तरी ही 

माझ्या नशिबी फक्त दुःख


इथे आळशी लोकांना

बरेच काही मिळते अन

कामकऱ्यांना मनस्ताप

मला नव्हते की हो ठाऊक


डोक्यावरील कर्ज वाढतो

रोज वाढत जाते काळजी 

माझ्या आत्महत्येमुळे सर्व

होतात काही दिवस भावुक


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi poem from नासा ( NaSa ) येवतीकर

Similar marathi poem from Tragedy