प्रेम
प्रेम
तूच आहे ह्या क्षणी गं
हासली गेल्या क्षणी गं
काय हेची प्रेम आहे
खिन्नता रित्या क्षणी गं
मेदिनीचे* रात्र फेरे
जागतो फेऱ्या क्षणी गं
मोगरा रातीस हासे
प्रेम ते खुळ्या क्षणी गं
या दिलाला बंधने का?
प्रेम दे दिल्या क्षणी गं
*[मेदिनी = पृथ्वी ]