जादूचा दिवा
जादूचा दिवा
असता माझ्याकडे
एक जादूचा दिवा
बोलवीन जिनला
पूर्ण करण्या इच्छेची हवा
एका इच्छेत सांगेन
संपव रोगराईला
पूर्ववत कर हे जीवन
मुक्त कर यातून जगाला
वाचव धरतीला
मातेच्या लेकराला
तुझ्यात आहे शक्ती
तर संपव या विनाशाला
दुसऱ्या इच्छेसाठी
हात मी जोडेन
दे सदबुद्धी मानवास
इथून पुढे नीट वागेन
जिन भाई एक विनवणी
उद्धट मानवास समजव
जीवन नाही पूर्वीसारखे
अतिउत्साहास आडव
तिसरी इच्छा एकच माझी
सुख शांती लाभो सर्वांना
रहो सदा कृपा यांच्यावर
उदंड आयुष्य मिळो सगळ्यांना
