STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Tragedy

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Tragedy

बेफिकीर

बेफिकीर

1 min
250


खिशात नाही दमडी

फिरण्यात दंग आहेत

उपाशी पोरे घरात हे

खेळण्यात दंग आहेत


जगात चाललेल्या

अनैतिक गोष्टीच्या 

पेपरमधील बातम्या

वाचण्यात दंग आहेत


लोकांना एकवेळचे

जेवण मिळत नाही 

हे क्रिकेटचा खेळ

पाहण्यात दंग आहेत


अन्नासाठी कोणी

चालतो तर कोणी 

पोटासाठी सकाळी

चालण्यात दंग आहेत


इथे कुणाला नीट

ऐकूच येत नाही 

मोठ्या आवाजात

बोलण्यात दंग आहेत


सीमेवर दुष्मनाच्या

हल्लेत जवान मरतोय

कॉमेडी शो बघत

हसण्यात दंग आहेत


नेहमीच जर तरची

भाषा बोलणारे 

नशिबावर दोष देत

रडण्यात दंग आहेत


यांना कशाचे काही

देणे घेणे नाही

बेफिकीर मौजमजा

करण्यात दंग आहेत



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy