हे असंच राहणार नाही
हे असंच राहणार नाही
हे असंच राहणार नाही
कोरोना फार काळ टिकणार नाही.
बंद दरवाजे पुन्हा एकदा उघडतील
भीतीने कोंडलेले श्वास मुक्त होतील.
शाळा, जिम, वाचनालये पुन्हा सुरू होतील
सुनसान गावं माणसांनी गजबजतील.
दुरावलेली नाती पुन्हा जवळ येतील
आपुलकीने एकमेकांचा हालहवाला विचारतील.
शेजारच्या बायबापड्यांच्या पुन्हा गप्पा रंगतील
रिकाम्या कट्टे नव्याने भरून दिसतील.
पाण्यासाठी नळावर पुन्हा झुंबड उडेल
रंगबिरंगी घागऱ्यांनी डोळ्यांचे पारणे फिटेल.
मृत भासणारी शाळा, कॉलेजं पुन्हा जीवंत होतील
खुप दिवसांनी वर्गात आवडते तास भरतील.
कोरोना नंतरचं जग नक्कीचं बदललेलं असेल
पैशापेक्षा इथे माणुसकीला किंमत असेल.
मनातील दुरावा भुर्रर्र उडून जाईल
माणुसकीचा नवा अध्याय प्रारंभ होईल.
म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा....
स्वच्छ हातपाय अन् तोंडाला मास्क
दररोजचा हा एकमेव टास्क...
