STORYMIRROR

Amar Misal

Fantasy Inspirational

3  

Amar Misal

Fantasy Inspirational

हितगुज

हितगुज

1 min
263

पंढरीच्या पांडुरंगा, 
आहेस का रे बरा...??

अख्या जगाचा पोशिंदा तू , 
स्वतःचीही काळजी घे जरा....!!

थकत नाहीस का रे असा उभा विटेवर,
युगे अठ्ठावीस दोन्ही कर कटेवर...!!

सावळे, सुंदर रूप तुझे रखुमाई चा तू वर,
भक्तांचे रक्षण करण्या असतोस सदा तत्पर....!!

आम्हालाही नाही करमत अरे लागून राहते तुझ्या दर्शनाची आस, वारीच्या त्या सोहळ्यासाठी मनात फक्त पंढरीचा ध्यास....!! 

आज आलो बघ सोडून मागे सारी सुख दुःखे आणि नश्वर तो संसार, धन्य झालो घेऊन तुझे दर्शन हे दीनदयाळा पालनहार....!!

पण मग आज एक वरदान मी मागणार आहे, तू तथास्तु म्हणशील हा माझा तुझ्यावरचा विश्वास आहे....!!

या कलीच्या युगात पापाचे साम्राज्य नष्ट होऊन सुखाचे दिवस येऊ दे, सर्वांना शांत, समाधानी आणि उदंड आयुष्य लाभू दे....!!

वेळ झाली आता निरोपाची देवा येईन पुढल्या खेपेला, तोवर विश्रांती घे पुंडलिक वरदे हरी विठ्ठला....पुंडलिक वरदे हरी विठ्ठला....!!😊😊


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy