वाट तुझी पाहतो आहे
वाट तुझी पाहतो आहे
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
नदीकाठच्या त्या पुलावर,
वाट तुझी मी पाहतो आहे,
येशील पुन्हा तू भेटायला
वेड्या मनाला समजावतो आहे......
बोलायचं नव्हतं ते बोलून,
तुझं प्रेमळ मन मोडावं लागलं
तुला आनंदी पाहण्यासाठी,
तुझ्यापासूनच दुर व्हावं लागलं........
स्वार्थ काही जणांचा,
वचनाची मर्यादा होती
नात्याच्या सुरवातीलाचं,
शेवटाची चाहूल होती......
सर्व काही तुला,
तत्क्षणी सांगता आलं असतं
आई मुलीची ताटातूट,
माझ्याच मनाला पटलं नसतं.....
एकदा भेटशील का...??
तुला सगळं सांगायचं आहे
आजही तुझ्या येण्याची,
वाट मी पाहतो आहे...
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

