Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Aarohan Educational channel

Tragedy

3  

Aarohan Educational channel

Tragedy

आई

आई

1 min
189


आई जरा जास्तच लवकर उठते सकाळी 

सडा सारवण करून,

भरत राहते रांगोळीत रंग

भविष्यातले स्वप्न रंगवत राहते मनोमन 

तेव्हा तुम्ही नुकतेच झोपलेले असता,

एखादी वेबसिरीज पाहून रात्रभर......


तीचा खूप जीव असतो, तुमच्यावर

इवल्या बाळाचा टाळू 

हळूवार मायेच्या हातानं माखला जातो

तसं सांभाळत राहते सारं घर....

तीचा खूप जीव असतो, 

फरश्यांवर,भिंतींवर, कपड्यांवर

माणसांपेक्षाही जास्त 

त्यांवर पडलेले डाग मोठा आटापिटा करून

स्वच्छ करत असते ती कायम...

तेव्हा तुम्ही योगाक्लास किंवा जिममध्ये घाम गाळून घेत असता स्वतःचाच...


डझनभर झाडं, किडे, मुंग्या 

पशुपक्ष्यांसाठी दाणापाणी कधी चुकत नाही

घरातली माणसं,एखादं जनावर निगुतीनं सांभाळत राहते..

गप्पा मारत राहते सगळ्यांशी..

तेव्हा तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत गावभरच्या 

चकाट्या पिटत असता तासन् तास ...


एखादा मोगरा पहिल्यांदाच फुलला की आनंदून जाते तीही

एखादी कळी खुडली तर हळहळते तीही 

एखादा गुलाब जळायला लागला 

तर ढाळते एक दोन टिपूस तीही 

कपाटातल्या साड्या, जून्या गोधडीच्या धाग्यांवर हात फिरवताना 

भूतकाळ उसवताना बोलत राहते ती स्वतःशीच...

तेव्हा तुम्ही आपल्या टिव्ही, फोन, लॅपटॉपमध्ये घुसून बधीर झालेले असता....


एव्हाना तीला कळायला लागलीय भाषा 

दगडमातीची,झाडाझुडपाची, पशुपक्ष्यांची....

आताशा तीला फारसा फरकच 

पडत नाही..

तुम्ही घरी असलात काय नि नसलात काय....

तीला फारसा फरक पडत नाही...


Rate this content
Log in

More marathi poem from Aarohan Educational channel

आई

आई

1 min read

Similar marathi poem from Tragedy