STORYMIRROR

Govardhan Bisen 'Gokul'

Tragedy

3  

Govardhan Bisen 'Gokul'

Tragedy

हे गायत्री माते

हे गायत्री माते

1 min
267

हे गायत्री माते तुझा, महिमा अपरंपार |

निश्चितच भयमुक्त, तू करशील संसार ||धृ||


अदृश्य या राक्षसाने, कसा मांडीयला खेळ |

कासावीस झाले सर्व, कशी आली आता वेळ ||

भितीने दाही दिशात, कसा माजे हाहाकार |

निश्चितच भयमुक्त, तू करशील संसार ||१||


भितीने येईना कुणी, आता कुणाच्या दारात |

लहान मोठे सगळे, बघा कोंबले घरात ||

अशा कठीण समयी, माते तुझेच आधार |

निश्चितच भयमुक्त, तू करशील संसार ||२||


सुबुध्दी दे मनुष्यास, दोन गजाची रे दुरी |

कोरोनाच्या बचावास, मास्कच आहे जरूरी ||

नियमाने सगळ्यांचे, नक्की होईल उद्धार |

निश्चितच भयमुक्त, तू करशील संसार ||३||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy