STORYMIRROR

Nurjahan Shaikh

Tragedy Others

3  

Nurjahan Shaikh

Tragedy Others

कोरोना जाशील का रे?

कोरोना जाशील का रे?

1 min
185

टाहो आईचा ऐकून 

बेचैन मन हे झाले, 

तुझ्यामुळे गेला बळी 

कोरोना जाशील का रे? 


बंद पडली ही दुकाने 

बंद सारी कारखाने, 

हैरान जग तुझ्याने

कोरोना जाशील का रे? 


उपासमारीची वेळ 

गरिबांवर आली रे,

तुझ्यामुळे आला काळ 

कोरोना जाशील का रे?  


कोरोनाचा कहर हा 

एकमेका न पाही रे,

नको आता ताटातूट 

कोरोना जाशील का रे?


पुरे तुझा धुमाकूळ 

थकलोय आम्ही सारे,

लढून तुझ्याशी आता 

कोरोना जाशील का रे?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy