तुझ्याविना
तुझ्याविना
मज जन्म देता! सुखावली माता!!
पाजी प्रेम पान्हा! अमृताचा!!
आभाळाची माया! सुखावते द्याया!
पा॑घरते छाया! पदराची!!
झाली तु कु॑भार! दिला तु आकार!!
थोर उपकार! आई तुझे!!
आम्हा घडविले! तिन्हे मढविले!
जीवन बनले! मौल्यवान!!
झुंजली दु:खाशी! निजली उपाशी!!
गाठले ध्येयाशी! कर्तृत्वाने!!
आई तुझ्या मुळे! जग सारे कळे!!
आम्हा सर्व मिळे कष्टातून! !
सरला उन्हाळा! ! गेला पावसाळा! !!
गेल्या सांज वेळा! उसवून! !
किती अश्रू गळे! मन माझे जळे¡
सारे काही उणे! तुझ्याविना!!
