जगवा नारी
जगवा नारी
जीवनाची पार्श्वभुमी
सुख दुःखाचे तट हे जीवनी
किती अडथळे किती संकटे
वाळवंटी झाड एकटे
खाच खळग्यांनी जग हे भरले
सोशिकतेने मन ही जळले
कुणी बनती मातीचे पुतळे
सृजनतेचे जगणे आगळे
कवटाळुनी ती संकटे सारी
समर्पणाने उभी ती नारी
जगाची ही रीतच न्यारी
तीच देते जगण्यास उभारी
करू नका गर्भपात
नाही तर होईल तुमचाच घात
सृष्टीची ती पालनहारी
म्हणूनच सांगते जगवा नारी
