स्वयंसिध्दा
स्वयंसिध्दा
चांदणी तू लुकलुकणारी
स्वयं प्रकाशाने चकाकणारी
का लागते तुला ग्रहण?
समाजाच्या त्या वावटळी मध्ये
पुसून टाकले जातात तुझे विचार
का सहन करतेस तू अत्याचार?
अन्यायाविरुद्ध बंड पुकार
तुझ्या अस्तित्वाचा कर तू स्वीकार
तरच मिळेल तुझ्या जीवनाला आकार
सोडून दे आता व्याभीचार
मुक्तपणे कर आता संचार
तुझ्या जीवनातील तूच योद्धा
स्वीकार कर तूच आहे स्वयंसिद्धा
