STORYMIRROR

Sanjay Ronghe

Tragedy Inspirational

3  

Sanjay Ronghe

Tragedy Inspirational

काय होतं हवं

काय होतं हवं

1 min
245

काय होतं हवं, काय होतं नको 

सांगतो तुला, नाही कळल मला ।

करतो विचार, बदलतात आचार

सांगतो तुला, नाही कळल मला ।

विचारांनी थकलो, मी आता हरलो

सांगतो तुला, नाही कळल मला ।

श्वास झाले मंद, पडेल हृदय बंद

सांगतो तुला, नाही कळल मला ।

दूर जळते चिता, म्हणे कशास भिता

सांगतो तुला, नाही कळल मला ।

आले यमाचे दूत, सांगे आहे मी भूत

सांगतो तुला, नाही कळल मला ।

हवी मज मुक्ती, मनात तुझी भक्ती

सांगतो तुला, नाही कळल मला ।

येईल मी परत, आली वेळ सरत 

सांगतो तुला, नाही कळल मला ।

नको आता ध्यास, मृत्यूचा भास

सांगतो तुला, नाही कळल मला ।

जीवन हे अमर, आजण मी भ्रमर

सांगतो तुला, नाही कळलं मला ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy