STORYMIRROR

Kanchan Thorat

Romance Classics

4  

Kanchan Thorat

Romance Classics

ओढ पावसाची...

ओढ पावसाची...

1 min
371

ओढ पावसाची मला...

माझ्या भेगाळल्या देहा!

वाट पाही दिनरात,

कधी येशील साजणा...?


कधी घेशील पैठणी?

कधी देशील तू चुडा?

माझ्या पायी कधी वाजे,

झुळझुळणार्‍या पैंजणांचा झरा?


डोईवर पदर हिरवा,

कधी डोंगर नटतील?

कधी मारशील मिठी?

कधी चुंबन देशील?


माझी तडकली काया...

तुझ्या विरहात राया!

तुझ्या मिठीत येईन...

अंग अंग भिजवाया!


घाल फुलांची तू माळा,

माझा, रिकामा रे गळा...!

ओढ पावसाची मला...

प्रसवणाऱ्या माझ्या देहा!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance