STORYMIRROR

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

3  

नासा ( NaSa ) येवतीकर

Inspirational

आशा

आशा

1 min
455


जीवन सुखी समाधानी

जगण्यास ठेवा थोडी आशा

काम पूर्ण झाले नाही तर

पदरी मिळते ती निराशा


कसलीही अपेक्षा न ठेवता 

करत जावे निस्वार्थी काम

अश्या कामात मिळतो आनंद

नक्कीच मिळते कामाचे दाम


पैसे खूप मिळावे वाटते

असेल काम करायला कमी 

अशा विचाराने पुढे चालून

खड्डयात पडतो आम्ही


लालच खूप वाईट असते

त्याने माणूस विसरतो स्व

आपले तुपले कोणी दिसेना

पैसा हेच त्याला वाटे सर्वस्व


जवळची माणसे अश्याने

दूर दूर निघून जातात

संकट समयीच्या वेळी 

कोणीच जवळ नसतात


कामाप्रमाणे दाम घ्यावे

नको आमिषाचा पैसा

जीवन होईल सुकर

जर सोडली अभिलाषा



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational