Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Latika Choudhary

Action Tragedy

2  

Latika Choudhary

Action Tragedy

डिजिटल

डिजिटल

1 min
7.1K


सायब आलं शाळंमंदी

म्हणलं-" शेल्फी घ्यायची 

बाई पोरांची,

क्यामेरा हाय का?

म्हणले,

"कायपण काय सायब,

बिना मोबाईलचं पोरगं न 

बिना क्यामेऱ्याचा मोबायल कधी आसतो काय?

आता सारं त डिजिटल झालं बगा

मोबायल,कॅमेरा,टेक्नोलाजी,

घर, खेडी, गाव, शहर, राज्य, देश, विश्व

सारं डिजिटल !

येवढंच काय ,

माणूस... मेंदू..मन...मनाचे आतले न भायेर चे व्यवहार.

नाती..रीतीभाती...सगे सोयरे..

पोरं ..न पोरांचे विचार

सारे ssss डिजिटल!

जलम..जगणं- मरणं

हसणं.. बोलणं..लिव्हणं

वाचणं... नी वाचणं 

सारं डिजिटल.

पण सायबजी,

माफी मांगते...जरा बोलते,

नेमकं डिजिटल म्हंजी

काय हो ?

सापडल का यात कुठं

माणूस माणसाला

माणसासाठी माणुसकी

जपणारा दावणारा!

हाय का कुठं 'गुरुजी'

आन गुरुजी दिसताच

आदबीनं हुभा

र्होणारा इद्यार्थी

बघा बरं ह्या

 'डिजिटल '

जगात?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action