तू आस सोडू नको
तू आस सोडू नको
आज तुझ्या पडताती
जरी सुखाचिये सडे
तरी हात तुझे तुला
भासताती का कोरडे ?
क्षण सुखी वेचावया
मन सैरावैरा झाल
तुझ्या पायी जाणिवेच
मात्र दडपणं आल
नवी उभारणी केली
आज जरी महालाची
तुझ्या मनाला आस ती
मात्र मायेच्या मिठीची
तुझ्या घायाळ मनाचीं
व्यथा कळते ग मला
तुझ्यापेक्षा तुझी व्यथा
भारी छळते ग मला
नाईलाज तुझा माझा
सर्व गुमान होऊ दे
नको धीर सांडू सये
जरी वादळं येऊ दे