आठव कधी
आठव कधी
आठव कधी तुला मी प्रपोज केला होता
तेव्हा तुझ्या गुलाबाचा भाव वर गेला होता
उत्तर सांगितलं नाहीस तू अजूनही मला
म्हणून प्रेमाचा घोट विषारी मी पिला होता
काय सांगू तुला आता मी रोजचे रडगाणे
तुझ्या आठवणींचा रोज रातीला मेळा होता
किती अन कुठे खर्च झाले शब्द कळले नाही
तू आल्यावर कळलं तो खजिना तू नेला होता
विसरू नकोस प्रपोज केलेली तारीख वेळ तू
माहीत आहे केलेला प्रपोज अलबेला होता
पुन्हा स्वप्न बनून तू आलीस जीवनात माझ्या
तुझ्यासाठी झुरणारा श्वास आज मेला होता
आज मी तुझ्या प्रेमासाठी तिळतीळ जळतो
मी गेल्यावर कळलं तुझ्या मनात हेला होता
