प्रेम कागदी फुलांचे
प्रेम कागदी फुलांचे
मी त्यास नदितीरी भेटले ,
सख्या उधळीत फुले,
मज दिशा फेकले,
फुले ते ओंजळीत ,
मी प्रेमाने एकेक झेलले l
खरे फूले नसूनी ,
खोटे कागदाचे,
सुगंध लावलेले ,
खरे तरी मलूल ,
कोमजुनी,कधी,
सुखणार मज वाटले l
असु देत ना कागदाचे,
ना कधीही मलूल,
ना कोमजनारे,
ना सुकाणारे,म्हणुनी,
आयुष्य भर ताजे,
टवटवीत छान राहिले l
खुशीने, प्रेमाने,
जीवापाड जपले,
जीव त्यात गुंतले ,
मन त्यात रमले ,
खरेच मज भासले ,
काळजात ते रुजले l
एकदा मज कळले ,
कागदी फुला सवे,
प्रेमही प्रियाचे आटले ,
नदीतीरी जाऊन बसले,
आठवणीत मन गहिवरले ,
बसता घेऊनी फुले ओंजळीत,
सुगंध घेता ओघळू ते आश्रु लागले ll

