STORYMIRROR

Ankita Kulkarni

Romance Tragedy

3  

Ankita Kulkarni

Romance Tragedy

प्रेम माझे एक अथांग सागर

प्रेम माझे एक अथांग सागर

1 min
191

💞त्याच्यावर माझे खूप प्रेम

   जणू एक अथांग सागर आहे l💞


💞डोळ्यांत त्याच्या दुःखाचा

    अश्रू एकही न येऊन देण्याचे

       माझे मलाच मी वचन दिले आहे l💞


💞प्रेम त्याचे मात्र कधी शांत लाटा

   तर कधी भयाण खवळणारे आहे l💞


💞कधी त्याच्या शब्दांनी

    माझे काळीज चिरत आहे l💞


💞कधी जखमांनी मन

    रक्तबंबाळ होत आहे l💞


💞समोर त्याच्या अश्रूंना

    हास्याचे बांध मी घालत आहे l💞


💞खोटे हसून हसून जोरात

    डोळ्यांतच अश्रुंना आटवत आहे l💞


💞एकांतात मात्र त्या अश्रूंना

    मनसोक्त ओसांडून देत आहे l💞


💞चिरलेल्या हृदयाला जोडण्याचे

    हे तर माझे रोजचेच झाले आहे l💞


💞मनाच्या जखमांना पण असेच 

      लेप लावून मी भरत आहे l💞


💞मी मात्र मला दिलेल्या वचनाला

           न तोडता जागत आहे l💞


💞त्याच्यावरचे माझे खूप प्रेम हे

     जणू एक अथांग सागर आहे ll💞


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance