STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Tragedy

3  

Vishal patil Verulkar

Tragedy

गेलीस जरी दुर तू

गेलीस जरी दुर तू

1 min
282

गेलीस जरी दूर तू एवढे मात्र कर

डोळ्यात तुझ्या आणू नको अश्रूची सर,


आठवण माझी आली तर होऊ नको दु:खी 

मी तुझ्यासाठी प्रार्थना करेल तू राहावी कायम सुखी,


तुझ्या प्रेम विरहाचे अश्रू मी गिळून घेईल 

तुला सुखात नांदत असताना आनंदीत मी होईल,


माझ्यावर प्रेम केलं होतं तू आठवणीत मला ठेव

आज काल सर्व बघत असतो म्हणे वरचाच देव,


आता प्रेम यातना खूप होतात हृदयात माझ्या 

अश्रू कधी येऊ देणार नव्हतो मी डोळ्यात तुझ्या,


का केले होतेस प्रेम प्रश्न कधी विचारणार नाही

तुझ्यापासून दूर राहून मी जास्त दिवस जगणार नाही,


तुझ्यासोबतचे स्वप्न सर्व तुटले माझे मी जगू तरी कसा 

जसा पाण्यातून बाहेर काढतो मासा मी तडफडतोय तसा,


मी कसाही जगत असलो तरी माझ्याकडे तू पाहू नको 

मला दु:खी बघून तू निराश कधी होऊ नको,


आज नाहीतर उद्या मी या जगातून जाईल 

जाण्याआधी मी जगाला विरह कविता लिहून वाहील,


कविता माझ्या वाचून एवढे मात्र कर

डोळ्यात तुझ्या आणू नको अश्रूची सर 

डोळ्यात तुझ्या आणू नको अश्रूची सर!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy