शेतकरी
शेतकरी
महागाईच्या जंजाळात
गरिबीन मारलय
माझ्याया शेतकरी बापाला
आशेनेच तारलय
राजकारणात पिसला गेलाय
बाप माझा
संप , आंदोलनाला ग्रासलाय
हा शेतकरी राजा
निसर्गाची ही साथ नाय
माझ्या बापाला
शासनाच्या निर्णयाची आस
या काळ्या आईच्या लेकाला
पावसाळ्यात पाऊस नाय
पिकाला दर नाय
दिवाळीच्या सण नाय
संपाचा निर्णय नाय
कष्टाला अंत नाय
तरी पण माझा बाप
आजवर शांत हाय
आजवर शांत हाय
