STORYMIRROR

Akshata Sakunde

Tragedy

3  

Akshata Sakunde

Tragedy

हरवलेलं जग

हरवलेलं जग

1 min
12K


दिवस सरलं

निखळ मैत्रीचं आता कोण बी नाय उरलं

बाजार झाला भावनांचा

स्टाईलच झाली भारी

साधेपणाला पुसेना कोणी

आता फकस्त चकाकीची भुरळ मनावरी


दिवस सरले

निरागस प्रेम फकस्त गोष्टीतच उरले

देकूपणाचा जादूला सगळेच भुलले

दिखाव्याच्या बाजारात

नाती आता संपलीत


दिवस सरले

गावाचे बी शहर झाले

शहरातच्या गर्दीत

माणसावर माणुसकी बी

पळायला लागली

माणूस पळत राहिलाय पण

माणुसकी पळून गेली


दिवस आज थांबला

माणूस माणुसकी सकाट

माघारी आला

बाजार आता मोडला

भितीच्या पोटी का होईना

पण भावनेला पुण्यांदा थारा मिळला

थांबलेल्या दिवसानं

शहराला गावाचं रूपडं नव्यानं दाखिवलं


Rate this content
Log in