STORYMIRROR

Nilesh Bamne

Tragedy

3  

Nilesh Bamne

Tragedy

चॉकलेट डे...

चॉकलेट डे...

1 min
223

मी देऊ केलेलं चॉकलेट

ती नेहमीच नाकारायची...

आता कळतंय मला

ती हे का करायची!


गुलाब दिलं नाही,

की प्रपोज केलं नाही

त्याचा राग होता तिला

तिला उगाच वाटायचं

मी तिला लहान समजतो

पण प्रत्येक वेळी तिला

मी दिलेलं चॉकलेट

प्रेमानेच दिलेलं होतं 


तिने चॉकलेट नाही

तर माझं

प्रेमच नाकारलं होतं...

आजही माझ्या हातात

चॉकलेट होते 

पण ती समोर नव्हती

समोर उभा होता

चॉकलेट डे...

ज्याला तिची प्रतीक्षा नव्हती

तर त्याच्या प्रतीक्षेत 

कोणीतरी उभी होती...


સામગ્રીને રેટ આપો
લોગિન

Similar marathi poem from Tragedy