फसगत
फसगत
तारूण्याच्या उंबऱ्यावर
धवल झाली कांती,
झेप घेणाऱ्या फुलपाखराला
वाट आता मोकळी.
ढगाआडून पाहणाऱ्या चंद्राला
चटक तीची लागली,
जणू शुक्राच्या चांदणीला
मदनाची सुभत्ताच लाभली.
मनावरच्या दडपणाचा
गळा तीने दाबला,
गुरफटलेल्या भावनांचा
कल्लोळ आता थांबला.
स्वप्न होते उशाला
थारा नव्हता मनाला,
शांत अचेतन रात्र होती
तीच्या उमेदीच्या काळाला.
जाग आली तेव्हां
बांध होता फुटलेला,
तीच्याच केसांनी शेवटी
गळा तीचा कापलेला...!
