जागर
जागर
1 min
227
त्याग वस्त्र बंधनांची
फुटलाय पाझर दगडालासुध्दा
ऐकून ललकारी तूझ्या अस्तिस्वाची.
खुटंवलीये गती
समाजाच्या मती नेे
विधात्याच्या नावाने,
मग होऊ दे जागर आता
सुप्त शक्तीचा.
चुल, मुल, कुळ ही तर थाप
मारलेली माथी तूझ्या,
सावरून यांना झुंजार
तूझ्या अस्तित्वाची
जींक लढाई लादलेल्या
जबाबदारीची.
नीर्मितीच नव्हे जन्म तूझा
तू तर साऱ्यांचीच आई
खरे पण....
निराळाच हेतू तूझ्या मागचा.
तू तर सहचारिनी, नव्हेस दासी
मग का भोगीती भोग म्हणोनी??
अन् त्यागीती नको म्हणोनी??
कृत असो वा कली
प्रश्न तूझ्याच शीलेचा
उठ पेटून दोन हात कराया
कारण इथे,
भक्षकच झालाय रक्षकचा!!
