किमया
किमया
1 min
347
भल्या पहाटे
ब्रम्ह मुहुर्तावर
विधात्याला
पडलेल स्वप्न
म्हणजेच 'स्त्री'
कनखर पण,
मेनाहूनही
मऊ अशी
जीची माया
ती म्हणजे 'स्त्री'
जिच्या काळजाला
सतत ममतेचा
पाजर फुठतो
ती असते 'स्त्री'
जिने लक्ष्मी, सावित्री,
जिजाऊ घडवली
ती होती 'स्त्री'
जिच्या रूपात
घराघरात वावरते
सुख, दु:खात रमते
ती सावलीरुप 'स्त्री'
जिच्या पाऊल खूनाने
सदैव नव चैतन्य जगते
ती हवीहवीशी 'स्त्री'
अबला नव्हे सबला
विधात्याची 'किमया'
म्हणजेच 'स्त्री'
सलाम तिच्या कर्तृत्वाला!!!
