STORYMIRROR

Anita Shinde

Romance

4  

Anita Shinde

Romance

झुळुक!

झुळुक!

1 min
539

झुळुक वाऱ्याची अशीच यावी

बावऱ्या मनाला बिलगून जावी...


कितीही कुठेही कशीही

तूझीच आठवण देऊन जावी...


आठवणीत तुझ्या बुडवून मनाला

गाली हसू फुलवून जावी...


बहरत सुवास ओठांवर यावा

रंग बावळा मिसळून जावा...


दोन जीवाचा एक दुवा

प्रेम प्रितीने बांधून ठेवा...


कातर आतुर वेळ अशीही

वेड्या मनाला भुलवत राही...


भेट अशी बेभान व्हावी

नभी वीज मग दाटून यावी...


मिलनाचा पाऊस धो धो बरसत

तूला अन् मला राहावा भिजवत...


इच्छा सदिच्छा मनी न उरली

झुळकी सरशी विरून गेली...


झुळुक ही वाऱ्याची गार

मनी प्रेमाचा रंग बहार...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Anita Shinde

Similar marathi poem from Romance