STORYMIRROR

नासा येवतीकर

Tragedy

3  

नासा येवतीकर

Tragedy

वीजमरण

वीजमरण

1 min
361


मृग नक्षत्राची सुरुवात 

सर्वत्र काळेकुट्ट ढग

काही क्षणात पाऊस पडणार

मोर पिसारा फुलवून नाचणार 

गावातील पोरं पाण्यात खेळणार 

आईसोबत शेतात गेलेली

लहान पिल्लू काखेत भिजणार

या पावसात हे सर्व घडणार 


असे वाटले असताना क्षणात 

नको असलेले घडले

आकाशात वीज चमकली

ढगांचा झाला गडगडाट

कुठे तरी वीज पडली 

लोकं बोलू लागली 

क्षणात एक बातमी आली

राम्याच्या आईवर वीज पडली


काखेतले लेकरु बिलगून

तशीच चिकटून होती

रडत नव्हती की हसत नव्हती

क्षणात या पावसाने साऱ्या

गावचा आनंद हिरावून नेला

तोच नेहमीचा पाऊस आत्ता

आठवणीत आला की

नकोनकोसा वाटू लागला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy