Prashant Subhashchandra Salunke

Comedy

5.0  

Prashant Subhashchandra Salunke

Comedy

वंडर वूमन

वंडर वूमन

4 mins
811


ह्या बायकांना लहान लहान गोष्टीत माहेरी निघूनजाण्यांची आपल्या नवऱ्यांना धमकी द्याची घाणेरडी सवय असते.                                                                 

आज माझा ही माझ्या पत्नीशी- दीपाशी वाद झाला होता.

तिने पण मला माहेरी निघून जाण्याची धमकी दिली.

इथे कोण असल्या धमक्यांना घाबरत आहे!

ज्या लोकांचे लग्न झाले नाही ते काय जगत नाही?

बायको दबवेल आणि मी दबल्याजाईन असल्या स्वभावाचा मी बिलकुल नाही. आजचाच प्रसंग पहा न! माझ्या बायकोने मला फळीवरून पोहे काढायला सांगितले. मला!!! मी स्पष्ट नाही सांगितले. अरे! भाऊ, हे काय आपल काम आहे का? आज पोह्याचा डब्बा काढायला सांगितला उद्या पोहे बनवायला सांगेल! चल... चल... मी नाही काढून देणार. माझे हे उत्तर एकून दीपा म्हणाली, ‘अहो, माझा हात फळीपर्यंत पोहचत नाही म्हणून तुम्हाला सांगितल!’ म्हणजे... म्हणजे माझा पहोचतो असंच नं? कानून के हाथ लंबे होते है... माझे नाही. माझी वर्तणूक पाहून दीपा मला धमकी देत म्हणाली, ‘मी जेव्हा माहेरी जात राहीन तेव्हा तुम्हाला कळेल.’ अरेच्या! जायचं तर जा... इथे कोण घाबरतं! बघं भाऊ, मी स्वतंत्र होतो... स्वतंत्र आहे... आणि स्वतंत्र राहीन... गुलामीची सवय मला लहानपणापासून नाही. भगतसिंह, सुखदेव, राजगुरू आणि चंद्रशेखर असे क्रांतिकारी माझे पूर्वीपासूनच आदर्श राहिले आहेत... आणि ही म्हणते... छे... परमेश्वराच नाव घेऊन मी पलंगावर आडवा पडलो आणि कधी डोळा लागला ते कळालचं नाही.

अचानक वाजलेल्या डॉरबेलच्या रिंगने माझे डोळे उघडले.

घड्याळाकडे पाहिलं तर पहाटेचे पाच वाजले होते!

हे कोंबडे आता आरवायचं सोडून डॉरबेल वाजवायला शिकले की काय?

मी चादर माझ्या तोंडावर ताणत म्हणालो, "कोण आहे?"

बाहेरून मोठ्याने आवाज आला, "दूध..."

मी कंटाळून माझ्या चादरीतून बाहेर निघालो आणि दार उघडले.

बाहेर दुधवाला दुधाचं कॅन घेऊन उभा होता.

मी जरा रागाने म्हणालो, "काय रे! सकाळच्यापारी लोकांची झोप मोडायला येतो की दुध द्यायला? दुध म्हणे... दुध.”

जणू जगाच आठव आश्चर्य असल्यासारखे दुधवाला माझ्याकडे पाहत होता.

मी म्हणालो, “ए बावळटा. असं माझ तोंड काय बघत आहेस? चल आता दुध दे.”

दुधवाला म्हणाला, “साहेब, दुध घेण्यासाठी आतून भांड आणा.”

झोप अजून माझ्या डोळ्यांवरून गेली नव्हती. मी जांभया देत देत आत स्वंयपाकघरात गेलो आणि भांड घेऊन आलो. दूधवाल्याने त्यात दूध ओतले. मी दुधाने भरलेलं ते भांडे आत स्वयंपाकघरात जाऊन ओट्यावर ठेवले आणि तसाच झोपायला गेलो. सकाळी अचानक मला जाग आली. मला ऑफिसमध्ये आज लवकर जायच आहे ते लक्षात येताच माझ्या डोळ्यांवरची झोप उडाली. मला भूक देखील पुष्कळ लागली होती. पोटात कावळे कोकायला लागले. समोर टेबलावर पाहिले पण त्याच्यावर चहा किंव्हा नास्ता कांहीही ठेवलेले नव्हते. अच्छा लक्षात आले. माझा नास्ता मलाच बनवायला लागणार होता. चादरीला एकबाजूला फेकून मी तसाच उभा झालो. आज मी नास्ता बनवणार होतो. ते पण माझ्या आवडीचा! पण स्वयंपाकघरात जाऊन पहातो तर काय? दुधाच्या भांड्यात एक पाल पडली होती. पण कशी काय? अरे हो! त्यावर झाकण ठेवायचं मी विसरून गेलो होतो. दुधा शिवाय आता चहा कसा बनवणार? सोडा तो चहा... नास्ता करण्याचा विचारकरून मी फ्रीज उघडलं आणि त्यात खाण्यापिण्याच्या वस्तू शोधायला लागलो. पण रात्री काय बनवून ठेवल असेल तर त्यात दिसेल नं! दोन फळं सापडली. जशी सापडली तशीच पोटात गेली. जठराग्नी शांत झाला. अजून बरेचशे काम बाकी होते. मी अजून आंघोळ केली नव्हती पण हा टॉवेल कुठे आहे? माझे कपडे पण जागेवर नव्हते! रोज तर इथेच टेबलावर ठेवलेले असयाचे! मी तातडीने कपाटात टॉवेल आणि माझे कपडे शोधू लागलो. सुमारे अर्ध्या तासानंतर मला टॉवेल सापडला. त्याच्या पंधरा मिनिटांनंतर कपडे सांपडले. म्हणजे ते शोधण्यांसाठी मला एकूण पंचेचाळीस मिनिटं लागली होती आणि नव्वद मिनिटं ते शोधण्यासाठी कपाटातून काढलेल्या वस्तूंना कपाटात परत ठेवण्यासाठी. जाऊ द्या तो विषय... आज घड्याळांचा कांटा वेगाने धावत होता. कदाचित नवीन सेल टाकण्याचा तो परिणाम असेल! माझी अजूनही आंघोळ झाली नव्हती. आंघोळीनंतर कपडे पण मलाच धुवायचे होते! नंतर जेवण!!! अरे! हो, ते पण मलाच बनवायचं होतं म्हणजे भांडीकुंडी पण मलाच घासावी लागणार! जर हे सर्व मी केलं तर ऑफिसला कधी जाणार? ठीक आहे, आज दुपारचं जेवण मी हॉटेलमध्ये करीन. हो हेच बरोबर आहे... अश्याने मला भांडी घासण्यांपासून तर सुटका मिळेल. संध्याकाळी घरी आलो की मग मी कपडे धुवीन. पण ते वाळतील कधी? आणि ऑफिसमधून आल्यानंतर जर मी कपडे धुवत बसीन तर रात्रीचं जेवण कोण बनवणारं? सोड तो वैताग. रात्रीचं जेवण पण हॉटेलमध्येच करीन. हा विचार येताच मी आनंदित झालो परंतु दुसऱ्या क्षणीच मनांत विचारं आला की दोनवेळी हॉटेलमध्ये जेवीन तर हॉटेलचं बिल किती होईल? माझा एका दिवसाचा संपूर्ण पगार तर हॉटेलमध्येच वापरला जाईल!!! सोड, घरीच काहीतरी बनवून खाईन. पण मग भांडीकुंडी घासावी लागतील त्याच काय! कपडे धुण्यांची डोकेदु:खी तर अजून तशीच आहे... आणि हो केरकचरा तर विसरलोच! “हे देवा! वाचव रे मला” असं कींचाळत मी जागा झालो.

शेजारी झोपलेली माझी बायको दीपा म्हणाली, “काय झालं? का ओरडताय? झोपू द्यान.”

हाश! माझी बायको माझ्या बाजूलाच झोपली होती. माझी लाडकी माहेरी गेली नव्हती. मी तर अगोदरच म्हणालो होतो की ह्या बायकांना लहान लहान गोष्टीत माहेरी निघूनजाण्यांची आपल्या नवऱ्यांना धमकी द्याची घाणेरडी सवय असते.

बाहेर दारावरून आवाज आला, “दुध...”

दीपा उठतच होती की मी प्रेमाने म्हणालो, “प्रिये! तू झोप... आज दुध घ्यायला मी जातो.”

दीपा म्हणाली, “दुध घ्यायला बाहेर जाल तेंव्हा जरा सूर्य पण बघा आज कुठल्यां दिशेने उगवला आहे ते.”

दीपाची झोपमोड होणार नाही ह्याची काळजी घेत मी स्वयंपाकघरात भांड घेण्यासाठी गेलो. जेंव्हा दार उघडलं तेंव्हा दुधवाला माझ्या हातात दुधाच्या दोन पिशव्या ठेवत म्हणाला, “साहेब, भांड का घेऊन आलांत?”

मी काही न बोलता चुपचाप दार बंध केलं आणि प्रेमाने पाहू लागलो मला आणि माझ्या ह्या घराला संभाळून घेणाऱ्या माझ्या वंडर वूमन दीपाला.


माझ्या आईच्या देहांतानंतर माझ्या आयुष्यातील सर्वात प्रभावी स्त्री जर कोणी असेल तर ती मात्र आणि मात्र माझी पत्नी दीपा आहे. तिचे माझ्या प्रतीचे प्रेम आणि काळजीचं मला मानसिक शांती देते आणि म्हणूनच तर मी निरनिराळ्या गोष्टी लिहू शकतो. नाहीतर तुम्हीच विचार करा की एखादी कैदाशीण मिळाली असती तर माझ डोक शांत राहिलं असतं कां? मी आज जश्या गोष्टी लिहू शकतो तश्या गोष्टी लिहू शकलो असतो कां? मुळीच नाही! आणि म्हणूनच ह्या “वंडर वुमन फॉर यु” स्पर्धेचं औचित्य साधून मी गोष्टीस्वरूपाने कौतुक केलं आहे माझ्या आयुष्यातील वंडर वूमन दीपाच.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy