Royal_ Mk7

Horror Fantasy

3  

Royal_ Mk7

Horror Fantasy

वाढदिवस

वाढदिवस

2 mins
197



सदर कथा आणि कथेतील सर्व पात्रे आणि घटना ही काल्पनिक आहे..याचा कशाशी संबंध नाही..असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


तो आज लवकर उठला..आणि त्याने पहिला आपल्या टेबल वरील फोन उचलला आणि एक सोशल मीडिया ऍप उघडुन मेसेज चेक करू लागला..पण त्याच्या हाती निराशा लागली,

 

कारण सकाळपासून एकही मेसेज आला नव्हता..


मग त्याने एक आयडिया केली..त्याने त्या ऍप च्या स्टोरीला आपला फोटो आणि फोटोच्या खाली स्वतःलाच हॅपी बर्थडे शुभेच्छा दिल्या आणि  

स्टोरी पोस्ट केली.

एक पाच मिनिट थांबला आणि फोन तसाचं ठेवून दिला..आणि कॉलेज ला जाण्यासाठी आवरू लागला..आवरता आवरता त्याच्या मनात एक विचार आला..

माझा आज वाढदिवस , मला सर्व नातेवाईक, मित्र मैत्रिणी आणि माझ्या ओळखीची सर्व मंडळी शुभेच्छा देतील , मी कॉलेज वरून घरी आल्यावर केक आणुन माझा बर्थ डे साजरा करतील ..असा विचार करत करत कॉलेजला जायचा टाइम झाला म्हणून तो सगळ आवरून कॉलेजला गेला..


कॉलेजला गेल्यावर पण, त्याला त्याच्या मित्र मैत्रीण यापैकी कुणीच शुभेच्छा दिल्या नाहीत.. तो नाराज झाला..पण परत विसरून गेला.


 कॉलेज सुटलं, तो घरी आला..

घरी पण त्याला त्याच्या शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी बर्थ डे शुभेच्छा दिल्या नाहीत..

तो परत नाराज झाला..त्याने परत आपला मोबाईल चेक केला ..मोबाईलवर पण सर्वांनी स्टोरी सीन करून बर्थडे शुभेच्छा मेसेज केला नव्हता..


त्याला आता इतका राग आला होता..त्याने हातातील मोबाईल जमिनीवर फेकला आणि बेडवर जाऊन झोपला..आणि त्याच अचानक लक्ष्य समोरच्या भिंतीवर गेलं आणि त्याला धक्काच बसला..

कारण समोर भिंतीवर एक फोटो अडकवला होता आणि त्या फोटोवर हार अडकवला होता..


तो फोटो दुसऱ्या कुणाचा नसून त्याचाच होता !


कारण, ऐन बर्थडे दिवशी कॉलेज वरून घरी येत असताना, गंभीर अपघात होऊन मृत्यू झाला होता..

आणि आज त्याचा मृत्यू होवून दोन वर्ष झाले होते.


सदर कथा ही काल्पनिक आहे बर का !






Rate this content
Log in

Similar marathi story from Horror