Royal_ Mk7

Drama Horror Thriller

3  

Royal_ Mk7

Drama Horror Thriller

त्याचं अस्तित्वं..

त्याचं अस्तित्वं..

2 mins
271


वाईट काळात आपल्या माणसाने ,आपल्या माणसाला थोडीशी हिंमत आणि थोडीशी किंमत दिली ना की, लोकांच्या आधाराची गरज भासत नाही !

बरोबर का ?


पण याला अपवाद तो..


तो खूप हुशार आणि शांत मुलगा...कुणाबरोबर कधी भांडण नाही..शाळेत कुठली त्याची तक्रार नाही..

आणि अभ्यासात सुध्दा हुशार.. आणि नुसता अभ्यासात नाही तर तो एक उत्तम चित्रकार सुध्दा होता..डोक्यात कल्पना आली की तो कागदावर उतरवत होता.. त्याला कुणी तरी विचारलं मोठेपणी काय बनणार आहेस तू ?

यावर तो - मी काही नाही बनलो तरी चालेल पण एक चांगला नागरिक बनणार..


पण...नियतीच्या मनात काही वेगळच होतं 

त्याच्या बाबतीत एक दुर्घटना घडली.. तो कॉलेजला बाईक वरून जात असताना गंभीर अपघात झाला..

अपघात इतका जबर होता की, त्याच्या लहान मेंदूला मार लागला होता..त्यामुळे तो मतिमंद झाला होता.

त्याने कॉलेज सोडून दिलं..

घरीच सारखा झोपून असायचा आणि सतत काहीना काही विचार करत बसत होता..

त्यामुळे त्याच आणि त्याच्या आई वडिलांचं पटेना ...

त्याच्यावर त्याचे पालक सारखे दबाव आणायचे की,

त्याने झोपून न राहता कॉलेज करावं किंवा बाहेर कुठेतरी जॉब करावा..

पण त्या पालकांना काय माहित की, त्यांचा मुलगा अपघात झाल्यामुळे डिप्रेशन मध्ये गेला आहे..

आणि त्याला हिंमतीची आणि आपल्या आधाराची गरज आहे..

पण नाही पालकांनी त्याला कधीच समजून घेतलं नाही..


6 महिन्यांनी,

आता त्याची अवस्था पूर्णपणे बिघडली ,त्याने खाणं-पिण सोडून दिले...त्यामुळे तो अशक्त झाला..

एकलकोंडा झाला...

त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी त्याची साथ सोडली...आधीच मानसिक आजारी असणारा तो अधिकच आजारी पडला...


आणि एक दिवशी रात्री तो झोपला तो कायमचाच..


त्याला एक सवय होती लहानपणापासून डायरी लिहायची ..त्या डायरीत त्याने लिहल होत की,

वाईट काळात माझ्या माणसांनी माझी साथ सोडली त्यामुळे मी जिवंतपणीच रोज मरणाचे अनुभव घेत होतो . आणि माझं अस्तित्व तर कधीच संपल होतं..!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama