Royal_ Mk7

Drama Inspirational

3.5  

Royal_ Mk7

Drama Inspirational

अपमानाचा बदला 2

अपमानाचा बदला 2

2 mins
251



पुढे...

भाग २


काव्या - पण मला वाटतं की, लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळे किंवा अपमानामुळे आपण आपलं व्यक्तिमत्त्व त्यागु नये..आपण अशा गोष्टींमुळे नाराज का व्हायचं ! आणि जॉब काय एक गेला की दुसरा येतो...don't worry!

आपण ना कोणत्या फालतू गोष्टींमध्ये इतकं involve नाही व्हायचं की, आपले अस्तित्व विसरून जाऊ !

पुढे तुझी मर्जी ?

 

आपल्या बहिणीच इतकं मोटिवेशनल ऐकून विराज खूप खुश झाला आणि म्हणाला की,

आता रडणार नाही लढणार.


विराज ने इतकं मनावर घेतलं की,


त्याने कामावर लक्ष्य न देता पहिले आपलं अपूर्ण शिक्षण complete केलं...


शिक्षण complete होताच, त्याला शहरात एका मोठ्या कंपनीत जॉब लागला. 

 

तो खूप खुश झाला...


तीन वर्षां नंतर,

विराज आपल्या अपार्टमेंट मध्ये टीव्ही बघत बसला होता की, त्याच्या दाराची बेल वाजली..

तो उठला आणि त्याने दार उघडलं.

तर दारात एक माणूस उभा होता


त्याला बघताच तो म्हणाला..

अरे दादा काही काम मिळेल का तुमच्याकडे?

प्लीज सर नाही म्हणू नका ! खूप गरज आहे कामाची!


विराजने त्या माणसाला पाहिले आणि

विराजला अचानक आठवलं की , हा तोच माणूस आहे...

ज्याने ३-४ वर्षापूर्वी आपल्या शॉप मधे बोलावून आपला अपमान केला होता आणि आपली लायकी काढली होती...

तो राग अजूनही विराजच्या मनात तसाचं होता..


आपल्या अपमानाचा बदला घ्यायची आयतीच संधी

चालून आली याचा फायदा घ्यावा म्हणून विराज त्या माणसाला म्हणाला..

चालेल पण माझ्या काही अटी आणि शर्ती आहेत...त्याचे पालन तुम्ही केले तर तुम्हाला मी कामावर ठेवेन ?


अट..

 १. सकाळी ७ वाजता कामावर यायचं..उशीर जर झाला तर जेवढा उशीर झाला आहे..तेवढा पगार कट केला जाईल.

२. न विचारता सुट्टी घ्यायची नाही, नाहीतर दहा दिवसाचा पगार कट केला जाईल.

३. कामात चुकारपणा जर केला तर पगार न देता कामावरून काढले जाईल !

४. कधी कधी माझी आई किंवा बहीण इथे येत असते , तर तिला बोलायचं नाही, त्यांच्यासमोर शायनिंग खायची नाही..

५. दिवसभर फक्त काम करत बसणे...टाईमपास केलेला मला आवडणार नाही..!


आणि महत्वाचं तुला महिन्याला पगार १४९९ रुपये दिला जाईल !


या सर्व अटि ऐकून, त्या माणसाला आठवले की..

विराज दुसरा कुणी नसून तोच आहे, ज्याचा आपण लायकी काढून अपमान केला होता..

तो खजील झाला , त्याच्या डोळ्यात पाणी आले..

त्याने विराज च्या पायावर डोके ठेवत म्हणाला,

विराज माफ कर मला...जेव्हा माझी वेळ चांगली होती..तेव्हा तू माझ्या कडे काम मागायला आला होतास, तेव्हा मी तुझी गरज न बघता तुझा अपमान केला...तुला नको तसल्या अटी घातल्या आणि तुला पळवून लावलं..

मला लाज वाटते ह्या गोष्टीची..मी जातो..!


येवढं बोलून तो माणूस निघून गेला.


तात्पर्य_ जेव्हा एखाद्या माणसाची वेळ खराब असेल ना तेव्हा त्याचा फायदा घेऊ नका ,नाहीतर

एकदिवस ती खराब वेळ आपल्यावर पण येते.


समाप्त.



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama