Mangesh Kulkarni

Drama Inspirational Children

4.0  

Mangesh Kulkarni

Drama Inspirational Children

अनोखी भाऊबीज

अनोखी भाऊबीज

1 min
202


सदर कथा आणि कथेतील सर्व पात्रे काल्पनिक आहेत.


दिवाळी, भाऊबीज सण..


सायंकाळच्या 7 वाजल्या असतील..

एका मोठ्या शहरात रस्त्याच्या कडेला एक छोटी झोपडी...त्या झोपडीच्या बाहेर 16-17 वर्षाचा मुलगा फाटक्या चटईवर बसला होता आणि समोर त्याची बहीण हातात ताट घेऊन त्याला ओवाळत होती..

ओवाळून झाल्यावर त्या मुलाने आपल्या बहिणीला भेट म्हणून पाटी व पेन्सिल दिली..

आणि म्हणाला..


" ताई, मी तुला याच्याव्यतिरिक्त काहीच देऊ शकत नाही, कारण मला परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही..माझी एक इच्छा आहे की,निदान तू तरी शिक आणि मोठी हो!"


(यावर त्या ताईने खूप सुंदर उत्तर दिले..)


त्याची ताई म्हणाली,

"दादा, बरोबर आहे तुझ...पण कधी कधी परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते...आणि हो, मी एकटी नाही शिकणार, तर तुला पण माझ्याबरोबर शिकावे लागेल. 

आणि आपण ह्या गरिबीला सांगू की,

"शिक्षणाने माणूस मोठा होतो."


हा छोटासा जरी क्षण असला तरी खूप काही सांगून गेला.


(हा माझा पहिलाच प्रयत्न आहे...काही चूक झाली असल्यास किंवा कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर sorry)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama