Royal_ Mk7

Drama Action Inspirational

4.0  

Royal_ Mk7

Drama Action Inspirational

अपमानाचा बदला - भाग १

अपमानाचा बदला - भाग १

3 mins
272


विराज आपल्या घराच्या पायरीवर मोबाईल वर काहीतरी पाहत बसला होता..इतक्यात त्याचा मित्रं राज तिथे आला आणि त्याला म्हणाला,

" अरे विराज असा एकटा का बसला आहेस! "

 

विराज - अरे काही नाही रे ! घरी बसून कंटाळा आलाय म्हणून मोबाईल वर जवळपास कुठे जॉब आहे का ते बघत होतो !


राज - अरे मग मला विचारायचस ! बर जाऊदेत ,एक काम आहे करशील का?


विराज - कोणत आहे ?


राज - तू आता फ्री आहेस ना? मग एक काम कर, आता माझ्यासोबत चल, तुला तिथे नेतो आणि तुझी आणि माझ्या मित्राची ओळख करून देऊन तुला तिथे जॉबला लावतो.

 

विराज - नक्की का? बर चल !


येवढं बोलून विराज आणि राज दोघे ही घराच्या बाहेर आले..राज ने बाईक आणली होती त्यामुळे दोघेही त्या बाईक वार बसले आणि 24 किलोमीटर लांब एका शहरात गेले.

तिथे जाताच ते दोघे एका कपड्याच्या शोरुम बाहेर थांबले..राज बाईक वरून उतरला आणि त्याने खिशातील मोबाईल काढून आपल्या मित्राला कॉल केला..आणि बोलू लागला.


2 मिनीटांनी कॉलवर बोलून झाल्यावर,


राज विराजला म्हणाला,

"अरे चल तुझ काम झालंय,तुला आत बोलवलंय !"


विराज - अरे पण कुठे ?


तू चल माझ्यासोबत अस म्हणत, राज विराजला त्या शोरूमच्या आत घेऊन गेला.

दोघेही आत त्या शोरुमच्या मालकाकडे गेले.


राज त्या मालकाला,

अरे रवी ,हा माझा शेजारी राहणारा मित्र विराज !

मी तुला आता कॉल करून याच्याबद्दल बोललेलो !


रवी - बर ! राज तू आता जा , मी याचा परिचय करून घेतो आणि याला काम देतो.


 राज त्या दोंघाची भेट घालून निघून गेला.


रवी विराजला - तुझ introduction करून दे.


विराज - माझे नाव विराज, मी बीए च्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे.


रवी - बर ! तुला या कामाची गरज का आहे?


विराज - घरची परिस्थिती थोडी बेताची असल्याने, पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी कामाची गरज आहे.


रवी - बर ! पण माझ्या काही अटी आणि शर्ती आहेत !


विराज - कोणत्या ?


रवी विराजला , अटी पुढीलप्रमाणे..

 

1) सकाळी 7 वाजता कामावर यायचं, जर उशीर      झाला, तर किती मिनिटे उशीर झाला तेवढे पैसे      कट होतील.

 2) मोबाईल वापरायचा नाही.

 3) रात्री शोरुम ९ वाजता बंद होईल..शोरुम बंद जरी    झालं असल तरी आतील सर्व कामे    आवरल्याशिवाय घरी जायचं नाही.

4) माझी पत्नी अधून मधून इथे येत असते..तर    तिच्याबरोबर बोलायचं नाही, तिच्यासमोर शायनिंग  मारण्याचा प्रयत्न करायचा नाही..मला ते पटणार  नाही. 

5) दुपारचं जेवण फक्त दहा ते पंधरा मिनिटात   उरकायच..जास्त वेळ काय टाईमपास करत  बसायचं नाही.

6) सुट्टी अजिबात मिळणार नाही..अचानक न विचारता सुट्टी घेतली तर दोन दिवसाचां पगार कट केला जाईल.

7) कामात कामचुकारपणा चालणार नाही, तस काही दिसल्यास कामावर न येणे.


आणि महत्वाचं राहिलं...

पगार दर महिन्याला 1,500 रुपये दिला जाईल.


असल्या अटी ऐकून विराज त्या मालकाला (रवीला) म्हणाला,

सर धन्यवाद, पण सध्या तरी मला कामाची आवश्यकता वाटत नाही..गरज पडल्यास कामाला येतो..


रवी(मालक) - अरे मग कशाला इथे आला होतास..

तुझी काम करायची लायकी नाही..जा इथून !


 विराज लगेच तिथून बाहेर निघून आला ,पण त्याच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते..

त्या मालकाने आपला अपमान करून आपली लायकी दाखवून दिली याचा विराजला खूप राग आला होता..

तो घरी आला आणि रडू लागला..


त्याच्या मोठ्या बहिणी काव्याने हे बघितलं आणि त्याला म्हणाली, अरे रडू नकोस अस ! ते काम मिळाले नाही म्हणून काय झालं ! दुसरीकडे जा आणि ट्राय कर..


विराज - अग दीदी, त्याने माझा अपमान केला याचा राग नाही आला, तर या गोष्टीचा राग आला की, त्याने

माझा चेहरा बघून माझी लायकी काढली !


काव्या - आता रडायचं नाही लढायच..!


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama