Royal_ Mk7

Romance Tragedy Thriller

3  

Royal_ Mk7

Romance Tragedy Thriller

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

3 mins
420


सदर कथा आणि कथेतील प्रसंग आणि सर्व पात्र हे काल्पनिक असून याचा कशाशी संबंध नाही.

असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


कॉलेज मधील असो अथवा शाळेतील पहिलं प्रेम हे कधीच न विसरणार असतं. 


प्रीती आणि आरव दोघे बी.कॉमला एकाचं कॉलेज मध्ये शिकत होते. दोघांचं कॉलेज मध्ये खूप जमायचं ,एकमेकांचे नोट्स शेअर करणे ,लेक्चर एकत्र बसून अटेंड करणे.. हे या दोंघाच चालू होतं.


हे बघून त्यांचे मित्र मैत्रिण या दोघांवर फार जळायचे ,कसे हे दोघे एकत्र न येतील यासाठी प्रयत्न करायचे ,पण काहीना काही कारण काढून प्रीती आणि आरव एकत्र यायची. हळू हळू दोघांची मैत्री झाली.. मग काय कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये एकत्र बसू लागले. दोघांनी एकमेकांचे फोन नंबर शेअर केले आणि मग काय ,

फोन कॉल,चॅटिंग आणि मॅसेज सुरू झाले. हळू हळू दोघांचं प्रेम फुलू लागलं. दोघे आता कॉफी शॉप मध्ये भेटू लागले. एकमेकांची सुख दुःख शेअर होऊ लागली.


एकदा असाच कॉलेजचा ट्रीपला एकाच बसने प्रीती आणि आरव फिरायला अलिबागच्या समुद्र किनारी गेले. तिथे समुद्र किनारी मजा मस्ती करू लागले.

पण अचानक आरवला काय सुचलं काय माहित ,

त्याने खिशातील गुलाबाचे फुल काढले आणि तिच्या समोर धरत ,


" प्रीती माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे..आय लव यू..

मी तुला कधीच सोडून जाणार नाही."


हा अनपेक्षित प्रपोज पाहून प्रीती लाजली.


" माझं ही तुझ्यावर खूप प्रेम आहे." ती आरवच्या मिठीत शिरत म्हणाली.


म्हणतात ना, की नियतीच्या मनात काही वेगळंच चालू असते.. तसच झालं.


प्रीती आणि आरवच प्रेम करणे ,प्रितीच्या शेजारी राहणाऱ्या रमा काकीला पटलं नाही. त्यांनी यांचं प्रेम प्रकरण प्रितीच्या वडिलांना सांगितलं. आणि बोलता बोलता म्हणाल्या की ,


" काय हे ,एवढ्याशा वयात ही नाटक..त्यापेक्षा माझ्या ओळखीचं एक चांगलं स्थळ आहे ,मुलगा मोठा सरकारी अधिकारी आहे...चांगला पगार ही आहे..लवकरात लवकर लग्न लावून द्या तीच."


हे कळताच वडिलांनी तिचा फोन जप्त केला आणि तिला एका खोलीत बंद केलं.


दोन तीन दिवस झाले..प्रीती कॉलेजला आलीच नाही,

आरवणे तिला फोन केला ,मॅसेज केला पण काहीच उत्तर आले नाही. आरवणे प्रितीची खास मैत्रीण राखीला कॉल लावला.


" हॅलो ,राखी अग तुझी मैत्रिण प्रीती कुठे आहे..दोन तीन दिवस झाले, कॉलेजला आली नाही."


राखी फोनवर ,

" अरे तुला माहित नाही का ? तुझ आणि प्रितीच प्रेम त्यांच्या घरी कळाले आहे..त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला कॉलेजला पाठवलं नाही आणि फोन ही जप्त केलाय."


हे ऐकताच आरवची तळपायाची आग डोक्यात गेली..त्याने फोन तसाच जमिनीवर आदळंला आणि

बाहेर येऊन गाडी काढली आणि सरळ प्रितीच्या घरी जाऊ लागला.


एका तासाने ,

आरव प्रितीच्या घरी गेला..आणि घरात जाताच तो तिला सर्वत्र शोधू लागला. 


ती वरच्या खोलीत होती. तो वर आला ,त्या खोलीचे दार उघडले आणि तिला भेटला. त्याला भेटताच तिला खूप आनंद झाला.. त्याच्या मिठीत शिरली आणि म्हणाली ,

" मी लग्न केलं तर तुझ्याशीच करेन ,नाहीतर नाही."


पण आरवच्या डोळ्यात पाणी होतं..त्याने प्रीतीला कडकडून मिठी मारली..तिच्या माथ्यावर चुंबन घेत म्हणाला,

" माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे...मी तुला कधीच सोडून जाणार नाही."


आरव येवढं बोलला आणि तिथून निघून गेला.


 रात्री 9 वाजता ,

पपा प्रितीच्या खोलीत आले आणि तिला जवळ घेत म्हणाले ,अग आज दुपारी एका ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तुझा मित्र आरव गेला. हे ऐकताच प्रीतीला मानसिक धक्का बसला. 


आरव दुपारीच अपघातात गेला होता ? तर मग भेटायला कोण आलं होतं..


आरवने तिच्यावरच प्रेम आयुष्याचा अगदी अखेरपर्यंत निभावलं होतं. 

आणि शेवटी तिला राहून राहून आठवू लागलं..

" शेवट माझ्या प्रेमाचा एवढा वाईट का झाला."


( प्यार कभी मरता नहीं , मरते हैं हम तुम ,

 होते है वो ,लोग अमर प्यार जो करते है.)


समाप्त.



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance