Royal_ Mk7

Drama Inspirational Children

3.6  

Royal_ Mk7

Drama Inspirational Children

शाळेतील सुंदर भाषण

शाळेतील सुंदर भाषण

1 min
96


डोरा म्हणजे माझी ५ वर्षाची लाडकी भाची..

ती जवळच मोठ्या गटात शिकत आहे..

ती बोलकी आणि हुशार असल्यामुळे शाळेत सर्व शिक्षक स्टाफची लाडकी आहे.


तिचा अजून एक किस्सा म्हणजे..


नुकतच त्यांच्या शाळेत एक छोटासा कार्यक्रम होता..

त्यामुळे तिला एका कार्यक्रमात भाषण म्हणायचं होत..

तिला तिच्या मॅडम ने भाषण पण एका कागदावर लिहून दिलं आणि म्हणाल्या की,

भाषण चांगलं पाठ कर आणि कार्यक्रमादिवशी नीट म्हणून दाखव , मागच्या वेळेस सारखी चूक करू नकोस !

ती हो म्हणाली.

आणि ती घरी आली..

दोन दिवस ती भाषण पाठ करत होती आणि घरी आमच्या समोर म्हणून दाखवत होती.


दोन दिवसांनी कार्यक्रमाचा दिवस उजाडला..


मी,डोरा आणि तिची आई तिच्या शाळेत गेलो..

आणि स्टेज च्या मागील बाजूला बसलो..

स्टेजवर दोन मुलांची भाषण झाली..

तीच नाव पुकारल..ती स्टेज वर गेली..

माईक समोर उभा राहिली..

आणि बोलू लागली..


नमस्कार, माझे नाव सावित्रीबाई फुले,

मी शिक्षण घेतले नव्हते,

माझ्या पतीने सांगितले की,

शिक्षणाने माणूस मोठा होतो,

त्यामुळे तुम्ही शिका आणि इतरांना शिकवा.

जय हिंद ,जय महाराष्ट्र !


येवढं बोलून तिने आपले चार शब्द संपवले आणि

स्टेज वरून उतरून तिच्या आईकडे गेली आणि बसली.


अजून तीन-चार मुला-मुलींची भाषण झाली.


तिथे बसलेल्या प्रमुख अतिथी यांना डोराच भाषण खूप आवडले म्हणून ,त्यांनी तिला स्टेजवर बोलावले व बक्षीस म्हणून ५०१ रुपये दिले..

आणि तीच कौतुक करताना म्हणाले की,

मला हिच्या भाषणातील एक मुद्दा आवडला की,

शिक्षणाने माणूस मोठा होतो..आणि हे अगदी खरे आहे.


डोरा ने भाषण म्हणून चार शब्द बोलले पण तिच्या भाषणातून तिने सर्वांची मन जिंकली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama