Royal_ Mk7

Horror Fantasy Thriller

4.0  

Royal_ Mk7

Horror Fantasy Thriller

भास की आभास

भास की आभास

4 mins
269


शहराच्या एका छोट्या एरियात..


रात्रीच्या १० वाजल्या असतील ,


हर्ष आपल्या खोलीत बेडवर शांत झोपला होता.

आज त्यांच्या घरी त्याच्या शिवाय कुणीही नव्हतं, 

त्याचे आई बाबा पार्टी साठी बाहेर गेले होते..त्याला चल म्हणत होते, पण आपली अशी ही अवस्था पाहून तो काय गेला नाही..

मग काय, तो आज रूम मध्ये एकटाच होता आणि

तो ज्या एरिया मध्ये राहत होता..तो एरिया एरवी सुंनसान नसायचा...पण आज अगदीच सूनसान झाला होता..सगळीकडे निरव शांतता पसरली होती.

का कोण जाणे, पण आज फार निरुत्साही आणि कोणीतरी आपल्यावर काबू ठेवून आहे असं त्याला सारखं वाटू लागलं. जसं जसा वेळ पुढे जाऊ लागला.. तसं तसा त्याला वाटू लागलं की ,आपण एकाकी पडलोय , काळ सोकावला आहे जणू.

राहून राहून त्याच्या मनात अनामिक भीतीच सावट जाणवू लागलं.


रात्रीच्या 12 वाजल्या...

घड्याळाचे ठोके पडले आणि हर्षला अचानक जाग आली..तो झोपेतून उठला.. आणि खिडकीजवळ जाऊन बाहेर पाहू लागला.बाहेरच वातावरण आज थोड वेगळच होतं...

सगळीकडे निरव शांतता आणि भकास अस भासत होतं.

अमावस्येच्या रात्रीपेक्षाही दाट,घट्ट भीषण अंधार ,जग कवटाळू पाहणारा ..या अचानक बदलेल्या वातावरणामुळे फारच अस्वस्थ वाटू लागलं.. त्याच्या अंगाला कापरे सुटलं होते. आपल्यासोबत पुढे काय घडणार आहे, याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आणि साशंक होता तो...आता पुढे नियती आपल्या बाबतीत काय घडवून आणणार आहे याची पुसटशी सुधा कल्पना नव्हती त्याला.. तेवढ्यात गार वाऱ्याची झुळूक येऊन गेली नी अख्खं अंग शहारंल गेलं त्याचे.

काही क्षणापुरंत पण या वाऱ्यात काहीतरी गूढ होतं 

आता मात्र त्याला अनामिक भीती जाणवू लागली..म्हणून पुन्हा आत बेडकडे वळत झोपायला गेला..नुकतच बेडवर पडला की, अचानक त्याला खिडकीच्या बाहेरून एक किंकाळी ऐकू आली !

ती किंकाळी इतकी भयंकर होती की, त्या किंकाळीने आसपासचा शांत झालेला परिसर दणाणून सोडला..

ती भयंकर किंकाळी ऐकून त्याच्या कानाचे पडदे फाटता फाटता वाचले ! 

तो घाबरून उठला आणि दबक्या पावलांनी खिडकीपाशी गेला आणि हळूच बाहेर पाहू लागला, तर त्याच्या खिडकीच्या बाहेर अगदी समोरच एक सावली पाठमोरी उभी होती,पाठमोरी उभी असल्यामुळे तिचा चेहरा काही दिसत नव्हता ? 

अचानक तिने मागे वळून पाहिलं,आकाशातील चंद्राचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला आणि हर्ष पूर्णपणे गारच झाला.. कारण त्या चेहऱ्यावर डोळे, नाक अस काहीच नव्हतं...आणि चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला होता..हे बघून हर्ष ने पटकन खिडकी झाकली आणि बेडवर जाऊन पडला..आणि आता बघितलेला चेहरा विसरण्याचा प्रयत्न करु लागला पण तो चेहरा काही डोळ्यासमोरून जाईना..


इतक्यात दरवाज्याच्या पाठीमागे कसला तरी आवाज येऊ लागला..त्याची हिम्मत होईना उठायची पण कसा तरी तो उठला आणि दरवाज्याच्या दिशेने पाहू लागला..कसलीतरी हालचाल तिथे होत होती..

हर्ष भित भित दरवाज्याच्या दिशेने गेला..आणि पाहू लागला की त्याच्या पाठीमागून दोन हात त्याच्या गळ्याभोवती आले आणि काही कळायच्या आतच त्याच्या मानेभोवती ब्लेडचे सपासप चार-पाच वार झाले..हर्ष रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला आणि त्याची नजर तिच्याकडे गेली..!!


तर ती होती "काळी सावली."


त्याला आपल्या जगात घेऊन, ती काळी सावली रात्रीच्या अंधारात गायब झाली.


दुसऱ्या दिवशी,

सकाळी सात वाजल्या असतील.

आज हर्षच्या लाईफ मधील सर्वात स्पेशल दिवस म्हणजेच वाढदिवस होता..म्हणून त्याचे आई बाबा त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या रूममध्ये आले..

पण हर्ष अजूनपर्यंत झोपलेलाच होता..

त्याचे बाबा त्याला झोपेतून उठवणार,

इतक्यात हर्षची आई म्हणाली, 

"अहो ,झोपुद्यात त्याला.. आज तरी निदान?? कारण खूप दिवसातून तो आज शांत झोपलाय."

"अग..आज त्याचा वाढदिवस आहे ना? मग शुभेच्छा नको का द्यायला !" बाबा म्हणाले.

"मग तो उठल्यावर शुभेच्छा द्या !"

"बर मग त्याच्या गिफ्टच काय?? अस करू आपण रात्री ऑफिसवरून घरी आलो ना ,मग त्याला त्याच्या आवडीचा नवीन मोबाईल घेऊन देऊ?"

"मस्त आयडिया आहे." आई उत्सुकतेने म्हणाली.


एवढच बोलून ते दोघेही हर्षच्या खोलीतून बाहेर पडले आणि सगळं काम आवरून दोघेही ऑफिसला निघून गेले.


रात्री 8 वाजता..

दोघेही ऑफिसमधून घरी आले..

दाराची बेल वाजवली.. खूप वेळ बेल वाजवून झाली , पण हर्ष आतून काहीच प्रतिसाद देईना आणि दार ही उघडेना ? शेवटी बाबांनी आपल्या जवळील डूप्लिकेट चावीने दार उघडलं..आणि आई बाबा दोघेही घराच्या आत गेले..


"अरे हा हर्ष कुठे गेला ? घर तर आतून बंद आहे !"

"अग असेल तो त्याच्या रूममध्ये ?"


दोघेही रूममध्ये गेले.तर हर्ष अजूनपर्यंत झोपलेलाच होता.दोघांनाही आता भीती वाटू लागली कारण सकाळी जाताना सुधा तो झोपलेला होता आणि आताही ? म्हणून बाबांनी त्याला उठवण्यासाठी त्याच्या अंगावरील चादर काढली, तर त्यांना धक्काच बसला..कारण तो तर हे जग सोडून कधीच गेला होता..त्याच्या गळ्याभोवती धारदार ब्लेडचे वार झाले होते, त्यामुळे अती रक्तत्राव झाला असल्यामुळे,

त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

दोघांनाही जबरदस्त धक्का बसला.

लगेचच त्यांनी पोलिसांना फोन केला..

पोलिस घटनास्थळी दाखल झाले,

त्यांनी त्या बॉडीचा पंचनामा केला आणि

पुढील कारवाई चालू ठेवली..

पोलिसांनी सर्व तपास केला आणि त्यांना तपासात आढळून आले की,


3 वर्षापूर्वी,

हर्षच्या बाबतीत एक दुर्घटना घडली..

तो आपल्या बाईक वरून कॉलेजला जात असताना त्याचा गाडीचा मोठा अपघात झाला...अपघात इतका जबर होता की, हर्ष तीन ते चार दिवस हॉस्पिटल मध्ये होता..त्याच्या बारक्या मेंदूला जबर मार लागला होता..त्यामुळे तो थोडा मतिमंद झाला होता..

त्याच डोकं फारस चालत नसायचं म्हणून त्याने कॉलेज सोडून दिले..कॉलेज सोडल्यापासून तो एकटाच आपल्या खोलीत राहत होता...रात्रीच्या अंधारात त्याचे संतुलन बिघडू लागले आणि हळू हळु तो मानसिक रोगी बनला.

' ती येणार आहे मला मारणार आहे ,मी आता तुम्हाला सोडून जाणार आहे.' असा सतत काहीना काही बडबडत असायचा..त्याला आभास होऊ लागले..

हळू हळू तो एकलकोंडा झाला..

त्याचे मित्र मैत्रीण आणि नातेवाईक त्याच्या पासून दूर राहू लागले..

तो आता अंथरुणावरच पडून राहू लागला..

एकाकी जीवन त्याला खाऊ लागले..

हळू हळू त्याने अन्नपानी पण सोडून दिले..

खाणं पिणे सोडून दिल्यामुळे तो अशक्त झाला होता..

इतका अशक्त झाला की त्याच्या अंगावर हाड दिसू लागली आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या..

रात्री अपरात्री त्याला भास व्हायचे की त्याच्या खोलीत त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणीतरी आहे..


वाढदिवसाच्या आदल्या दिवशी..म्हणजेच काल रात्री

तो झोपला असताना, अचानक त्याच्या खोलीत एक काळी सावली प्रकट झाली...ती हळू हळू त्याच्या जवळ येऊ लागली...काही कळायच्या आत त्या सावलीने त्याच्या गळ्यावर वार केले आणि रात्रीच्या अंधारात ती गायब झाली.


हर्षचा ज्या जागी अपघात झाला होता, 

ती जागा झपाटलेली होती..

मग ती काळी सावली ?


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror