Royal_ Mk7

Horror Fantasy Thriller

3  

Royal_ Mk7

Horror Fantasy Thriller

अनामिका एक रहस्यं

अनामिका एक रहस्यं

6 mins
563


रात्री चे दहा वाजले होते..

समुद्रकिनारी एका होडीच्या शेजारी जय अगदी शांत बसला होता.समुद्राच्या लाटांकडे एकटक पाहत कसल्यातरी गाढ विचारात तो होता..अगदी शून्यात नजर.

जय स्वभावाने अगदी शांत आणि संयमी असा तो.

शहरात एका कॉलेजमध्ये शिकायला आला होता..

पण हॉस्टेलची काय सोय झाली नाही, म्हणून मित्राच्या रूममध्ये शेअर करून राहत होता..पण एक दिवस त्याच्या लाईफ असा आला की, त्या दिवसापासून त्याची जगण्याची इच्छाच संपली. म्हणून तो सतत डिप्रेशन मधे राहू लागला ..त्याच अस एकटं राहणे त्याच्या मित्राला पटेना म्हणून त्याच आणि त्याच्या मित्रांच यावरून भांडण झालं.

मग काय, मित्राने त्याला हाकलून दिलं.. म्हणून आपल सगळं सामान एका बॅगेत भरुन जय रूम मधून बाहेर पडला . पण इतक्या रात्री जायचं कुठे? म्हणून इथे समुद्र किनारी येऊन बसला.


त्याने खिशातील मोबाईल काढला आणि टाइम बघू लागला तर दहा वाजून गेल्या होत्या.. त्याने आसपास बघितलं तर आसपास त्याच्या व्यतिरिक्त कोणीच तिथे नव्हत.

समुद्र किनारी भयाण शांतता पसरली होती.

कसलाच आवाज नव्हता.. आणि कसलीच चाहूल नव्हती.. 

आता वातावरणात गारवा वाढू लागला.. जसा जसा घड्याळ्याचा काटा पुढे जाऊ लागला तसतशी रात्र अजून गडद होत चालली होती.


जय मात्र आपल्याच गाढ विचारात होता. तेवढ्यात समोरून एक लाट आली आणि किनाऱ्यावर आदळली..त्या लाटेच्या आवाजाने जय विचाराच्या तंद्रीतून बाहेर आला..

इतक्यात समोरून कोणीतरी आपल्या दिशेने येत आहे याची चाहूल त्याला लागली.कोणीतरी स्त्री सदृश्य सावली पण अंधार असल्यामुळे स्पष्ट काही दिसत नव्हत..

इतक्यात ती सावली चालत येऊन त्याच्या समोर थांबली.. चंद्राचा पिवळसर प्रकाश त्या चेहऱ्यावर पडला..तर त्याच्या समोर एक २६-२७ वर्षाची मुलगी उभी होती.. दिसायला गोरी , काळेभुरे केस आणि चेहऱ्यावर छोटंसं हसू..अस तीच नैसर्गिक सुंदरता..

जय तिच्याकडे डोळे मिचकावत पाहू लागला..

ती तरुणी त्याच्याकडे पाहत गूढपणे हसली..आणि तिथे त्याच्या अगदी शेजारी जाऊन बसली..

दोन तीन मिनिटे झाली असतील..

जयने हळूच आपली मान तिच्याकडे फिरवली आणि तिच्याकडे एकटक पाहू लागला


तो मुलगा आपल्याकडेच पाहतोय, हे पाहून ती मुलगी त्याच्याकडे पाहत म्हणाली

" एक्स क्युज मी ?..काही अडचण आहे का ?"

 "कssक.. काही नाही ..सॉरी !" जय अडखळत म्हणाला.


"सॉरी बर का ! पण, मी मगापासून बघत आहे की,

तू इथे बसला आहेस आणि तुझ्या चेहऱ्यावरून साफ दिसतय की,तू कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहेस." ती तरुणी जयकडे पाहत म्हणाली.

"काही नाही हो, असंच !!" जय नाराजीच्या सुरात म्हणाला.

 "अरे मित्रा, असं कसं, तुझ्या चेहऱ्यावर उदासी दिसत आहे ? कुणावर नाराज आहेस का ?" ती जयच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली.

"हो, सध्या टेन्शन मध्ये आहे मी !" 

"काय झालं सांगशील का ?" तिने उत्सुकतेने विचारले.

"अग पण, मी माझा प्रॉब्लेम तुला का सांगू, आणि त्यात तू अनोळखी आहेस ? " जय रागात म्हणाला.


"अरे ए मित्रा.. मी जरी तुझ्यासाठी अनोळखी असलेना ? तरी, एक मैत्रीण म्हणून तू तुझा प्रोब्लेम शेअर करू शकतोस ,नो प्रोब्लेम." ती गोड आवाजात म्हणाली.


तीच हे वाक्य ऐकून जय विचारात पडला.


"एवढा काय विचार करतोयस ?? अरे तुला हवं नसेल मैत्रीण, तर एक मोठी बहीण म्हणून सांग?

मी तुला नक्कीच हेल्प करेन.." ती दिलासा देत म्हणाली.

"अगं पण तु कोणं आहेस, ते मला सांगितलं नाही ?" जय म्हणाला.


"ओह सॉरी, मी तुला माझं नावचं सांगायला विसरले ..

मी अनामिका इथे जवळच राहते." ती ओळख देत म्हणाली.

"मग तु इथे काय करतेस ?? 

"अरे इथे जवळच माझं क्लिनिक आहे.. तेथूनचं माझ्या स्कुटीवरून माघारी येत होते ,पण बघ ना ?? मध्येच माझी स्कूटी बंद पडली, म्हणून येथे थांबली आहे." 

"हो का ?" 

"बायदवे ,तू इथे काय करतोयस.. रात्रपण खूप झालीये आणि आजूबाजूला ही कोणी नाहीये." तिने उत्सुकतेने विचारले.


"काही नाही ? माझ्या लाईफमध्ये प्रोब्लेम चालू आहे आणि तो मला फेस करता येईना..म्हणून इथे बसलोय एकांतात.. माझ्या प्रश्नांची उत्तरं शोधत."


"माझं एक ऐकतोस का ?"

"काय ??"


"अरे घड्याळ्यातं बघ ,रात्रीच्या साडे दहा वाजून गेल्या आहेत आणि ह्या समुद्र किनारी आपण दोघे सोडून कुणीही नाही आणि त्यात तू असा डिप्रेशनमधे आहेस.. त्यामुळे तू आता माझ्या सोबत माझ्या घरी चल."

"नको सॉरी हा ,आपण दोघे एकमेकांसाठी अनोळखी आहोत ना दीदी ??"


"अरे आत्ताच तर तू मला दीदी म्हणालास ना ? मग,आपल्या दिदीच नाही ऐकणारेस तु??"

"सो सॉरी हा दीदी, पण घरी नको !"

"अरे तू स्वतः कडे ह्या तीनचार दिवसात बघितलं आहेस का?? तुझी काय हालत झाली आहे , माझ्यामते तू सध्या प्रचंड तणावात आहेस आणि तुला आधाराची गरज आहे."


असं म्हणताच त्याचे डोळे भरून आले तो रडू लागला.

"अरे तू मुलगा आहेस ना...मग ! अस रडायचं नसत.. Boys don't crying.. चल उठ पाहू." 

जय आणि अनामिका तिथून उठले आणि थोडसं पुढे चालत जाऊन स्कुटीजवळ पोहचले.. ती पुढे बसली आणि मागे जय स्कूटीवर बसला.आणि तिने स्कूटी स्टार्ट केली आणि आपल्या घरी जाऊ लागली..

कोणत्या तरी निर्जन रस्त्यावरून यू टर्न घेत तिने स्कूटी सरळ एका बंगल्याजवळ नेली.

समोरचा निर्जन आणि भकास बंगला पाहून भीतीची एक लहर जयच्या अंगाला चाटून गेली.

दोघेही खाली उतरले.. आणि चालत जाऊन त्या बंगल्यात गेले..आत जाताचं तिने त्याला समोर बसायला सांगितले.

"तू बस आराम कर ,तोपर्यंत मी फ्रेश होऊन येते आणि

येताना तुला चहा आणते." असं म्हणतं ती आत निघून गेली.

जय इकडे तिकडे पाहू लागला.. आतील वातावरण जरा गूढच होतं.. तेवढ्यात ती आतून त्याच्यासाठी चहा घेऊन आली त्याचा समोर ठेवला आणि म्हणाली 

"हा घे चहा आणि काय झालं ते सविस्तर सांग."

जयने समोर ठेवलेला चहा उचलला आणि पिऊ लागला.

पण चहा पिता पिता त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू येऊ लागले..

तिने ते पाहिले आणि म्हणाली

"अरे काय झालं, ते तर सांगशील का ? "

"थांबा दीदी सगळं सांगतो." जय डोळे पुसत म्हणाला.

"हा पटकन पटकन !"

"मी जय, इथे या शहरात एका कॉलेजला आहे.. 

खूप चांगलं चाललं होतं..पण अचानक माझ्या लाईफमध्ये एक गर्ल आली ...मिता."

दिसायला सुंदर आणि आकर्षक होती..तिला जेव्हा मी पाहिले तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो..पण मला ती भाव देत नव्हती.. म्हणून मी तिच्याबरोबर मैत्री केली..

हळू हळू तिला माझा आणि मला तिचा स्वभाव आवडू लागला .. आम्ही कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये एकत्र बसू लागलो..आणि मनसोक्त गप्पा मारू लागलो..

बघता बघता आमची छान मैत्री झाली.

पण, एक दिवशी ती कॉलेजला आलीच नाही , म्हणून मी तिला कॉल केला पण तिने कॉल रिसिव्ह केला नाही..

मला तिची काळजी वाटू लागली , म्हणून मी लेक्चर अटेंड न करताच तिच्या घरी पोहचलो..पण तिच्या घरासमोर गर्दी जमली होती...मी गर्दीतील एका माणसाला विचारलं तर तो म्हणाला की, 

इथे राहणारी मिता काल रात्री एका आजापणात गेली..!

हे ऐकताच मला जोरात धक्का बसला ..जिच्यावर मी मनापासून प्रेम केलं, ती अचानक हे जग सोडून कायमची गेली.. खूप दुखी झालो मी...मला ते सहन झालं नाही..

आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्या व्यक्तीला असं अचानक गमवनं सोपं नाही.. म्हणून गेले तीन चार दिवस झालं.. मी डिप्रेशनमध्ये आहे.


ती : "i relly very sorry , मी तुझ्या Feelings समजू शकते..पण, मला असं वाटतं की, कुणी असं सोडुन गेलं , म्हणून आपण आपली लाईफ का थांबवायची ? 

आणि हो , तू म्हणालास ना की..तू डिप्रेशन मध्ये आहेस. तर , accept the situation आणि कोणामध्ये involve इतकं नाही व्हायचं की, आपण आपल अस्तित्व विसरून जाऊ ..आणि मुली किंवा प्रेम, एक गेलं तर दुसरं येत , Dont worry..!! मला आवडेल की, तू माझं ऐकलेलं ? पुढे तुझी मर्जी ?"


हे ऐकून तो खूपच इमोशनल झाला आणि त्याने तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं रडू लागला.


"अरे,ये मित्रा, मी तुला किती समजावते आहे.

अस रडून कसं चालेल..अरे दुनिया खूप मोठी आहे रे.

आपल्या आयुष्यात ना, काही अनोळखी माणसं येतात.. बघता बघता आपलं आयुष्य बनून जातात..

आपले जरी असले तरी प्रत्यक्षात काही दिवसांचे सोबती असतात.. काही दिवसांचे सोबती असले,तरी जाताना आठवणी मात्र आयुष्यभर पुरतील इतक्या देवून जातात..!

त्यामुळे तू आता रडणं थांबव आणि छोटीशी स्माईल 

दे बघू." ती त्याचे डोळे पुसत म्हणाली.


अनामिकाचं हे ऐकून जय निशब्द झाला.. त्याने तिच्याकडे पाहत हलकीशी स्माईल दिली.


"अरे मित्रा, अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून निराश नसतं रे व्हायचं.. ती सोडून गेली म्हणून काय झालं.. दुसरी कोणीतरी नक्की येईल.. तू जा आता तुझ्या घरी आणि एक नवीन आयुष्य सुरु कर." ती त्याला समजावत म्हणाली.


हे ऐकून त्याला काय बोलावे तेच सुचेना ?

कारण एकतर अनोळखी भेटलेली मुलगी आणि तिने सांगितलेले मोटिवेशन.. 

जय खुश झाला आणि आपल्या घरी जाण्यासाठी अनामिकाचा निरोप घेतला आणि तिथून बाहेर येऊन चालत आपल्या घराकडे जाऊ लागला.

थोड पुढे गेल्यावर अनामिकाकडे पुनः एकदा शेवटचं पाहण्यासाठी मागे वळून पाहिले ? तर..

अनामिका आणि तिचा तो निर्जन बंगला तिथे नव्हताच.. हवेत अचानक विरून गेल्यासारखी अनामिका त्याच्या समोरून गायब झाली, त्याला वाटलं आपण जे बघितलं ते कदाचित भास असेल म्हणून तो तसाच चालत पुढे जाऊ लागला..

पण थोडंसच पुढे गेल्यावर अचानक त्याच लक्ष्य रस्त्यावर खाली पडलेल्या एका पेपरवर गेलं आणि त्याला धक्काच बसला ?.. कारण थोड्या वेळापूर्वी ज्या अनोळखी मुलीशी म्हणजेच अनामिकाशी आपण बोलत होतो..

तिच्या मृत्यूची बातमी त्या पेपर मध्ये छापून आली होती.. जय हे पाहून अवाकच झाला

त्याचा मनात एक विचार आला,

"जी लोक आतून मरतात ना ,

ती दुसऱ्यांना कस जगायचं ते शिकवून जातात."


"अनामिका एक रहस्य होती आणि रहस्यंच बनून राहिली."


ही एक काल्पनिक कथा. पात्र ,प्रसंगात किंवा इतरत्र कुठे साम्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

 



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror