Royal_ Mk7

Children Stories Drama Inspirational

3  

Royal_ Mk7

Children Stories Drama Inspirational

एक छोटंसं पत्र

एक छोटंसं पत्र

2 mins
270


सारांश - एका लहान बहिणीने आपल्या भावाला मोबाइलच्या जमान्यात लिहलेले एक छान आणि छोटंसं अभिनंदन पत्र.


राज आपल्या रूममध्ये अभ्यास करत बसला होता , इतक्यात त्याची लहान बहीण ६ वर्षाची भक्ती त्याच्याजवळ आली आणि त्याला म्हणाली ,

" भैया ,मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणले आहे देऊ का ?

राज चकित होऊन ,

" ये भक्ती ,काय ग ! ..काय आणलस ? आज माझ्यासाठी !

भक्तीने चेहऱ्यावर छोटंसं हसू आणल आणि आपल्या हातात आणलेले एक गिफ्ट राज च्या हातात दिलं आणि रूमच्या बाहेर धावत गेली.


राज खूप हसू आलं ,आणि तो मनात विचार करू लागला 

' अरे ही ,गिफ्ट देऊन अशी का पळत गेली .आणि काय असेल या गिफ्ट बॉक्स मध्ये ?

अस म्हणून राज ने गिफ्ट बॉक्स उघडले तर त्यात एक

छोटासा कागद होता..आणि त्या कागदावर काहीतरी मजकूर होता..आणि मजकुरावरचे अक्षर लहान होते.


राज ने तो कागद हातात घेतला आणि वाचू लागला ,

तो कागद नुसता कागद नव्हता तर ते होतं,

" एक पत्र छोटंसं ".


__________________________

 

                     भक्ती एस पी

                     मु पो. पुणे

                     दि ३१ जानेवारी २०२३


प्रिय राज,

   सप्रेम नमस्कार.

 कालच मला समजले की ,तुझ्या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत तुझा प्रथम क्रमांक आला. सर्वात पहिल्यांदा तुझे हार्दिक अभिनंदन ! अभिनंदन ! तुला चित्र कलेची आवड आहेच. आणि हो, मला ही तू नेहमी चित्र काढण्यासाठी सतत मदत करत असतोस. आई व बाबांनाही खूप आनंद झाला. तू अशाच अनेक स्पर्धेत भाग घेत रहा आणि खूप खूप मोठा हो. पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन राज भैय्या.

कळावे,

                           तुझी बहिण,

                           भक्ती.

___________________________________


हे वाचून राजच्या डोळ्यातून अलगद पाणी आलं..

आणि त्याने तो कागद (पत्र) ड्रॉवर मध्ये जपून ठेवले आणि आपल्या रूमच्या बाहेर जाऊन आपल्या बहिणीकडे म्हणजेच भक्तिकडे गेला आणि तिला उचलून घेऊन तिचा गालाचा पा घेतला आणि म्हणलं

" किती गोड आणि सुंदर लिहलस गं तू ! , मस्त..तुला ना ,आता उद्या माझ्याकडुन पण छोटंसं गिफ्ट ".


सदर पत्र छोटंसं आहे कारण की ,तिने जेवढं सुचलं तेवढं लिहलं, ते ही कुणाची मदत न घेता.


सदर पत्र लेखन हे सत्य आहे, पण काही कारणास्थ यातील सर्व पात्रे आणि घटना थोडी बदलली आहे.

    


Rate this content
Log in