Jyoti gosavi

Comedy

2  

Jyoti gosavi

Comedy

तुझी दाढी जळू दे

तुझी दाढी जळू दे

2 mins
65


तुझी दाढी जळू दे

 पण माझं वांग भाजू दे


ही एक ग्रामीण पारंपारिक आणि थोडीशी विनोद अंगाने जाणारी म्हण आहे. याचा अर्थ असा आहे की, काही व्यक्ती इतक्या स्वार्थी असतात की, स्वतःची गोष्ट साध्य करण्यासाठी समोरच्याचे काही झाले तरी चालेल. त्याला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण माझं काम झालं पाहिजे ,अशी मनोवृत्ती असते. 


दोन मिया एकदा जंगलातून प्रवास करत असतात ,त्या काळात पायी पायी प्रवास, सोबतच आपली शिदोरी, आणि एकत्र बसून कुठेतरी खायची, जवळच असेल त्या नदी ओहोळाचे पाणी प्यायचे आणि पुढे चालायचे असा तो काळ होता. 


एका मिया बरोबर बायकोने भाकऱ्या बांधून दिल्या आणि भाजी टिकणार नाही म्हणून अख्खे वांगे दिले. जंगलात कुठेतरी भाजा, तिखट मीठ टाकून भाकरीबरोबर खा, असे सांगितले. 

रस्त्याने अजून एक सोबत भेटली, दोघे चालू लागले. एकाने आपली शिदोरी खाल्ली, दुसऱ्याला भूक लागली पण अंधार पडला. कुठेतरी एका पडक्या घरात आश्रय घेतला, पण बाहेर जाऊन काट्याकुट्या गोळा करून आणणे आणि वांगे भाजणे याची त्याला भीती वाटू लागली. 

जो जेवला होता तो डाराडून झोपी गेला, याच्या मात्र पोटात कावळे ओरडायला लागले.त्याने बघितलं तर शेजारी झोपलेल्या मियाची दाढी अगदी लांब हातभर आहे, जमिनीवर लोळत आहे .

मग त्याच्या डोक्यात कल्पना आली या मियाच्या दाढीवरच आपलं वांग भाजलं तर! आपल्याला बाहेर जायला नको, 

आणि त्याने काढले चकमकीचे दोन खडे; आणि घासले मियाच्या दाढीवर, झालं! दाढीने पेट घेतला, आणि या मियाने आपलं वांग त्याच्या दाढीवर भाजायला ठेवलं, काही वेळाने दाढीने चांगलाच पेट घेतला आणि मिया झोपेतच हातपाय झाडू लागला, डोके हलवू लागला, तर याने त्याला "थोडा रुको! थोडाही रह गया, थोडा रुको! थोडाही रह गया, "करत दाबून ठेवले,आणि शेवटी मीयाची संपूर्ण दाढी जळून मीयाचे तोंड देखील भाजले. 


 हा किती स्वार्थी आहे बघा! की ,तो समोरचा माणूस मेला तरी चालेल, त्याचं तोंड विद्रूप झालं तरी चालेल, पण माझं वांग भाजलं पाहिजे. 

अशा वृत्तीची समाजात खूप माणसे असतात, म्हणूनच म्हटलं आहे 

"तुझी दाढी जळू दे

 पण माझं वांग भाजू दे"


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy