तो आणि ती - "उत्तर..!"
तो आणि ती - "उत्तर..!"
गेल्या महिनाभरात त्याच्याकडे जाणे जमलं नाही. तो ही एका मर्डर केस मध्ये बिझी होता. त्याची रिसर्च अशाच सामान्य लोकांना न आवडनार्या विषयांवर होती. मी एकदा विचारल तर त्याने सोप्या भाषेत criminal psychology असं काही उत्तर दिलं होतं. मला यात इंटरेस्ट नसल्याने मी परत कधी विचारलं नाही. तो त्याच्या कामात असेल तेव्हा त्याला कशाचेच भान उरायचे नाही, म्हणून मी भेट ही टाळत होते, तो मी अचानक गेले तरीही मला टाळनार नव्हता हे नक्की. असो काही दिवसात माझे exam सुरु होनार होते म्हणून त्याला एकदा भेटावं वाटत होतं.
गेल्या महिनाभरात त्याच्या घरासमोर काही बदल नव्हता ते जास्वंद सोडून. तो वेळेवर खतपाणी देत होता. गुलाब आणि जास्वंद अधिकच मोहरुन आले होते. दरवाजा उघडा होता. आत गेले मात्र त्याचा काही पत्ता नव्हता. सगळं घर फिरुन पाहिलं पण तो कोठेच नव्हता. (टेरेस. तो नक्कीच टेरेसवर असेल.) जिन्याने तिकडेच निघाले जरा घाईतच.
'जरा हळू. पायर्या निसरड्या आहेत' वरच्या मजल्यावरुन आदेशवजा काळजीयुक्त आवाज आला. मी ही हळूहळू वर गेले. तो झोपाळ्यावर जाडजुड पुस्तक वाचत बसला होता. माझ्याकडे न पाहताच त्याने शेजारी बसायला सांगितले. १५ मिनीटांनी ते पुस्तक खाली ठेऊन माझ्यावर नजर टाकली. मी मान झोपाळ्याच्या मागच्या बाजुवर टेकवुन डोळे बंद करुन बसले होते.
'बर्याच दिवसांनी आलीस?' - तो
'तुला कळतं कसं मी आलीये म्हणून. कितीही हळू याव तुझा सल्ला ठरलेला. हळू ये, खाऊन घे' मी वैतागुन बोलत होते.
तो गालातच हसला. असा तो फार कमी हसतो. उठुन खाली निघाला.
'मावशींनी जेवन छान बनवलय आज. चल सोबत जेऊ. मला आज एकटं नाही जेवायचं.' तो खाली जात बोलला.
(मी ऐकतेय की नाही याची पर्वा न करता. पण त्याला माहीत आहे तो खाली गेलाय म्हणजे मी ही लगोलग निघनार. हा कसा एवढा मला ओळखतो.)
मी विचारातच जिना उतरत होते, आणि व्हायचं तेच झालं, तिसर्या पायरीवरुन पाय घसरला ते थेट खाली. लागल नाही पण तो हातातल काम सोडुन पळत आला.
'तुला सांगितलेल कळत नाही का? हळू ये सांगितलं होतं ना.' तो रागात बोलत होता.
'relax, लागल नाहिये मला काही.' त्याच्या डोळ्यात राग आणि काळजी स्पष्ट दिसत होती. मला सोफ्यावर बसवुन तो आत किचनमध्ये गेला. दोन ताटं आणि पाणी घेऊन आला. पुर्ण जेवन होईपर्यंत एकही शब्द नाही बोलला.
'जेवण छान होतं,' मी च बळेच बोलले. त्याने माझ्याकडे पाहीलं. मी अनाहूत नजर दुसरीकडे फिरवली.
(कदाचित जे त्याच्यापासून लपवायचं आहे ते त्याला समजु नये म्हणून. मग मी इथे आलेच का? समोर नसते आले तर त्याला कुठे कळनार होत.)
'काय छळतयं???' तो काहीतरी माहीत असल्यासारखा बोलला. मी मात्र चोरी पकडल्या गेल्यासारखी धास्तावले.
'relax, तुला नसेल comfortable वाटत तर राहू दे' तो पुन्हा लॅपटॉपमध्ये काहीतरी खरडत बसला. मी डोळे मिटून सोफ्यावर डोकं टाकलं.
झोप उघडली तेव्हा दुपारचे चार वाजले होते. माझ्या अंगावर त्याने त्याचा कोट टाकला होता. समोर थर्मासमध्ये चहा होता. तो मात्र नव्हता. मी फ्रेश होऊन चहा घेऊन निघाले. कुलुपाची चावी मनीप्लांटमध्ये व्यवस्थित ठेवली, जिथे तो कायम ठेवायचा आणि त्याच्या घरातुन निघाले. दोन दिवस कॉलेजला गेले नाही. त्याच्यासोबतही काही बोलन झालं नाही. हो मला काही तरी त्रास देत होत. झुरत होते मी हि. जेवण कमी झालं होतं. कोणीतरी समजुन घ्याव अस सतत वाटायचं. पण त्याला त्रासही देऊ वाटत नव्हता, त्याला पुन्हा भेटले असते तर त्याने पुन्हा विचारलच असतं. काळजीत पडला असता. हा जे काही मी भोगत होते ते परिक्षेचं टेन्शन नक्कीच नव्हतं.
कॉलेज गेटच्या बाहेर आले तेव्हा त्याची brezza बाहेरच उभी होती. तो गाडीच्या आतच होता. माझे खोल गेलेले डोळे त्याला दिसू नये म्हणून मी गॉगल चढवला. त्याने आतुनच पुढचा दरवाजा खोलला. मी ही यांत्रिकपणे आत जाऊन बसले. त्याने आज आकाशी रंगाचा शर्ट घातला होता, ब्लॅक गॉगल डोळ्यावर होता. माझ्याकडे एकदाही न पाहता त्याने गाडी त्याच्या घराच्या दिशेने वळवली.
'कसा आहेस?' मी च सुरुवात केली. त्याने काही उत्तर दिलं नाही. (हा रागात असावा बहुदा मला उगीचच वाटून गेलं. पण नाही हा का रागात असेल.पण त्याला राग येऊ शकतो कशाचा माहित नाही.) त्याने गाडी त्याच्या घरासमोर उभी केली. माझ्या बाजुचा दरवाजा खोलुन तो आत निघुन गेला, मी हि मागे गेले.
'काय झालय सांगशिल का' मी काकुळतीला येऊन विचारलं. त्याने डोळ्यावरचा गॉगल काढला. कधी नव्हे ते एवढे लाल डोळे होते त्याचे.
'का वागतोय असा?' मी माझी रिघ पुढे खेचत बोलले. तो जवळ आला आणि माझा गॉगल त्याने हाताने दुर केला. माझे सुजलेले लाल झालेले डोळे त्याने पाहू नये म्हणून मी नजर खाली केली.
'अजुनही विचारनार आहेस?' तो रागात बोलत होता.
'ते परिक्षेच टेन्शन...'
'प्रिया..." तो रागातच पुनः ओरडला. एवढ्या दिवसात तो पहिल्यांदा मला प्रिया म्हणाला होता.
'अजुनही सांगनार नाहीस??' तो थोडा शांत होत बोलला. मी त्याला ओलांडुन सोफ्यावर बसले. उगीचच कोठेतरी नजर लाऊन, भानावर आले तेव्हा त्याच्या हातात जेवनाच ताट होतं. नेहमीप्रमाणं जेवतांना कोणीच बोलल नाही.
'बोल.' तो माझ्यासमोर फरशीवर बसत बोलला. आज पहील्यांदा मी नजर मिळवली.
'अपेक्षा......' त्याची नजर खाली गेली.
'मी दमलेय आता. एक सोपी साधी लाईफ हवीये.पण ती हि मिळत नाहीये. आसपास फक्त negativity आहे. काय करु. ज्याच्या कडुन मला अपेक्षा आहे ती व्यक्ती तर कायम अबोला धरुन आहे. जे मला समजतयं ते प्रत्यक्षात का नाहीये.' मी शांततेत बोलले. मला काय बोलायचं होतं हे तो कदाचित समजुन गेला होता.
'तू आधीच बोलायला हव होतं.' तो खिन्न होत बोलला.
'यापुढे तू पुन्हा कधी या घरी यायच नाही.' तो कठोर होत बोलला.
'आपण परत कधीच भेटनार नाही. तुला या प्रश्नांमध्ये टाकनारा मी च आहे. आणि त्याच्या तुला त्रास होतोय हे सहनीय नाहीये माझ्यासाठी.' शेवटच्या वाक्यात अतोनात प्रेम, दुःख आणि यातना होत्या. डोळ्यातुन आसवं आपोआप बाहेर पडली. पण माझ्याकडे एकदाही न पाहता तो वर निघुन गेला. मी काहीवेळ तशीच बसुन होते.
लोकांना समजून घेनारा आज मला न समजता निघुन गेला होता. माझी वाट पाहनारा तो, त्यानेच मला कायमच निघुन जायला सांगितले होते. मी बाहेर कशी आले माहीत नाही. पण इथुन पुढचं लाईफ त्याच्याशिवाय फार अवघड असनार आहे हे नक्की. तो आहे, तो असनार आहे पण मी नसेल.

