Priya Jawane

Romance Fantasy

3  

Priya Jawane

Romance Fantasy

तो आणि ती - "मावळती...!

तो आणि ती - "मावळती...!

4 mins
223


तुमको देखा तो ये ख़याल आया!!!

ज़िन्दगी धूप....तुम घना साया....


आज फिर दिल ने...इक तमन्ना की....

आज फिर दिल को....हमने समझाया....

ज़िंदगी धूप तुम...


तुम चले जाओगे तो सोचेंगे....

हमने क्या खोया....हमने क्या पाया

ज़िंदगी धूप तुम...


मी घरात प्रवेश केला तेव्हा रेडिओवर जगजित सिंग यांची ही गजल चालू होती. अर्जुनचं आवडत्या गाण्यामध्ये बसनारं असं हे गाणं होतं. मला अनेकदा त्याने गिटार, बासरी, माऊथ ऑर्गनवर ही वाजवूनही दाखवलं होतं. मला मात्र एवढे संथ गाणे कधी आवडायचे नाहीत. पण एक होतं, हे गाणे माहोल बनवायचे. एक आयुष्याचा ठेहराव होता यात. एक सुरेख गीत, असिम शांतता आणि संयमी समाधानी त्याचा चेहरा. 


तो सोफ्यावर मागे रेलुन डोळे बंद करुन गाण्याचे बोल साठवून घेत होता. मी आलेली समजले असेल तरीही त्याने अजुन डोळे उघडले नव्हते. रेडिओ वर गाणं संपल तसा तो आरजे भन्नाट असं काही मोठ्याने बोलू लागला. तरीही अर्जुनने डोळे उघडले नाहीत, झोपला असावा बहूदा. पण दुपारचे १२ वाजलेत यावेळी हा झोपनार नाही. मी रेडिओ बंद केला. तरीही तो हलला नाही अथवा उठला नाही. तो खरोखर झोपेत होता. 


(ही झोपायची वेळ नाही. अर्जुनची तर नक्कीच नाही. याची तब्येत ठिक आहे ना.) 


मी काळजीने त्याच्या माथ्यावर हात ठेवला. तसे त्याने अचानक डोळे उघडले. मी खूप जवळ होते त्याच्या तो ही दचकून सावरुन बसला. मी ही झटक्यात दुर झाले. त्याच्याकडे पाठ करुन उभी राहीले. डोळे आपोआप घट्ट मिटले होते माझे.


'कधी आलीस?' त्याने आळस देत विचारलं. मी आधीचं विसरुन त्याच्या शेजारी बसले.


'तुमको पाया तो ये खयाल आया...' मी मोठी स्माईल देत म्हनाले.


'अच्छ‍ा म्हणजे गाणं सुरु असताना.' - तो


'हो, पण खरच खुपच शांत गाणं आहे. तू ऐकून झोपला चक्क?' मी त्याला त्रास देण्याच्या उद्देशाने बोलले.


'काही गाणे मन शांत करतात मग अशा वेळी झोप शांत येनारचं ना?' त्याने भुवई वर करुन हसत मलाच प्रश्न केला.


'अच्छा म्हणजे आज तुझ मन शांत नव्हतं तर.' माझा प्रतिप्रश्‍न. तो मात्र मान खाली घालून हलकेच हसला.


'आज इकडे कशी? कॉलेज?' त्याने विषय बदलला.


'प्रोजेक्टच काम होतं, ते झालं. मम्मी पप्पा एका लग्नाला गेलेत, सो लंच सोबत घेऊ म्हणून इकडे आले'


'लंच अरे बापरे' तो उठून किचनकडे निघाला.


'का काय झालं?' - मी


'मावशी आलेल्या नाहीत. तुला भुक लागल्यावर घर डोक्यावर घेतेस, त्याअगोदर काहीतरी बनवतो' तो फ्रिजमध्ये डोकावत हसत बोलला.


'राहू दे मी बनवते. तु विचार करण्यातच वेळ घालवशील.काय खानार??' मी किचन अॅप्रन घालत बोलले. 


'वरणभात???' तो प्रश्नार्थक नजरेने बोलला.


'स्वर्ग!!!' मी लगेचच कुकरमध्ये भातवरण लावलं. 


दोघं पुन्हा हॉलमध्ये आलो.


(आज याच्या घरी आल्यापासून एक वेगळाच सुवास मला जाणवतं होता. भुक आणि बाकी तंद्रित मी विचारायचा विसरले होते.)


'हा सुंदर वास कुठून येतोय? तु नवीन....' - मी


'अत्तराचा...!' माझं वाक्य पुर्ण होण्याअगोदर तो बोलला.


'अत्तर!!! तु तर कधी वापरत नाहीस' माझा पुढचा प्रश्न.


'जवळकर काकांनी दिलयं.' तो स्मित करत बोलला.


(तो पुन्हा मला एक व्यक्ती ऐकवनार होता. मी सोफ्याच्या खुर्चीवर पालथी मांडी घालून बसले.)


जवळकर काका आणि त्यांची पत्नी राधा काकी. काका आधी आर्मीत होते त्यामुळे खुप शिस्तीत आयुष्य गेलं. दोन्ही मुलं उत्तम शिक्षण घेऊन परदेशात स्थायिक झाली. अनेकदा ते काका आणि काकींना तिकडे घेऊन जायला आले पण काकींना घर आणि काकांना देश सोडवेना. काका आणि काकी आनंदी होते त्याच्या आयुष्यात. मात्र हळूहळू काकींची नजर अधू झाली, त्यांना दिसने पुर्णतः बंद झाले. आता काकांची परिक्षा होती, ती त्यांनी पुरेपुर पुर्ण केली. ते सतत काकींसोबत होते. काकींना स्पर्शाची जाणिव व्हायची आणि. . . . . . . . वासाची. . . . . .सुवासाची.


काकांनी मग छंदच जोपासला. वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर, फुलं जमवायचा. राधा काकी त्या सुवासाने आनंदीत व्हायच्या. अनेक वासाची फुले काकांनी अंगनात लावली, गुलाब, जाई, जुई, मोगरा, अबोली, कन्हेर, चाफा, निशीगंध. . . . . . .काका रोज अबोली आणि मोगर्‍याचा गजरा बनवतात काकींसाठी. दृष्टी भलेही नसेल पण राधाकाकींना भक्कम असा प्रेमाचा आधार होता. त्या सतत आनंदी असतात. त्यांची मुलंही हि दुर राहून यांची पुरेपुर काळजी घेतात. काका काकींही खुप आनंदित आहेत. त्याच्याकडे पाहून प्रेमाचा अर्थ कळतो. उतारवयातही तरुण असणारं त्याचं प्रेम खरचं आदर्श आहे.


सांगताना तो खुप खुश वाटत होता. कदाचित आयुष्याच्या मावळतीला असा प्रेमाच्या गोडव्याचा स्वाद त्यालाही हवाहवासा वाटत असेल. मी त्याला तसं पाहून आनंदित झाले. तोच आनंद माझ्या चेहर्‍यावर त्याला दिसला असेल. इतक्यात कुकरची शिटी वाजली. थोड्यावेळात आम्ही जेवायला घेतलं. नेहमीप्रमाणे जेवतांना शांतता होती.


'अर्जुन. . . .' मी सगळं आवरुन सोफ्यावर बसत त्याला आवाज दिला. त्याने माझ्याकडे पाहीलं. उठून समोरच्या शोकेसमधून काही अत्तराच्या कुप्या माझ्यासमोर ठेवल्या. 


'तु मघाशी कोणत्या विचारात होतास?' मी दबकत विचारलं. कारण त्याला वाईट हि वाटू शकतं किंवा मला न सांगण्यासारखं काही असेल तर ते त्याला आतमध्ये छळू शकतं. त्याने त्याच हसू अजुन दृढ केलं.


'माणूस समाजशील प्राणी आहे. एकांत, एकटेपण व्यक्तीला आतल्या आत संपवतं असतं. मलाही वीट आलाय या एकांताचा. . . . . . . .' 


तो धुंदीत बोलत होता. शुन्यात नजर लावून. मग अचानक माझ्याकडे पाहत डोळ्यात असीमित प्रेम आणून, त्या अत्तरांच्या कुप्याकडे एक एक बोट दाखवत, थंड श्वास घेत तो म्हणाला,

'मला आता सोबतीचा सुवास हवाय, अबोल शब्द हवेत, मनात भरनारा श्वास हवाय, नकळतेपणाचा साज हवाय, कधी तो रुसवा पाहीजे, तर कधी हवाहवासा आवाज पाहीजे, या घराला सतत जिवंतपणा देणारी पिऊ हवीये मला आता कायम . . . . . अगदी आयुष्याच्या मावळतीपर्यंत. . . . . . .' 


मला काय बोलाव ते सुचेना. आज तो मनातल उघड बोलला होता. आज त्या भावनांत शब्द होते. मी फक्त हसून माझी नजर खाली घातली, आणि त्याने सगळ्या अत्तराच्या कुप्यांची झाकणं काढून तो बंद असलेला सुवास हवेत मोकळा केला.


"शिकायते खत्म हो गयी है 

अब बस इक-दुसरेका साथ है

हम तो मिलो चले आये आपके साथ

अब बस एक दरख्वास्त है

ना जाना कभी दुर, ना जाने देना हमे. . . . 

हम तो कब से तरसे थे इस पल के लिये. . . .

अब बस साथ आप और ये रास्ते है।"


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance