Priya Jawane

Romance Fantasy

3  

Priya Jawane

Romance Fantasy

तो आणि ती - "वृंदा...!"

तो आणि ती - "वृंदा...!"

4 mins
246


आज बर्‍याच दिवसांनी त्याच्याकडे जायचा विचार केला. थोडी कामात होते, त्यानेही मेसेज केला नाही. माझी पटकथा मात्र त्याने उत्कृष्ट लिहिली होती. सरांना आवडली होती.


'पुन्हा असं काही मी परत लिहिनार नाही.' अस मला बजावलं हि होतं. पण त्याला कसं मनवायचं हे ही मला माहीत होतं. मध्ये एकदा त्याला फोन केला होता तेव्हा कामानिमित्त बाहेरगावी आहे, एवढचं काय ते समजलं. 


तो social media वापरत नाही मात्र लोकांशी त्याचे मनापासुन नाते असायचे. अगदी लहानांपासुन मोठ्यापर्यंत. मागे एकदा त्याच्या घराजवळच्या बागेत एका आजोबांसोबत तो बोलत होता. माझा फोनही दुर्लक्षित केला. खरं आहे म्हणा, मला नंतर समजवता येऊ शकतं पण त्यावेळी ते आजोबा नक्कीच त्यांच्या मनाचा कुठलासा कोपरा उलगडत असावे. तो आहेच असा, समजुन घेनारा, विश्वासू, अनोळखी लोकांना आपलसं करणारा. मी गेले तर तो आनंदी व्हायचा पण कधी दाखवत नव्हता. एकटेपण अनेकदा खात असेल त्याला. कित्येकदा म्हणाले घरी येत जा पण स्वारी ऐकेल तेव्हा ना. असो, आज घरासमोरची झाडं खुपच खुलली होती, माळीकाकांची मेहेरबानी. तसे मागच्या भेटीत ते दिसले नव्हते, कामात असतील दुसरीकडे. दरवाजा नेहमीप्रमाणे उघडा होता. मी आत गेले तो सोफ्यावर ते च वरच्या कप्पातलं एक पुस्तक वाचत होता. बाजुलाच एक नोटपॅड आणि पेन पडलेला होता, कदाचित लक्षात घेण्यासारखे मुद्दे लिहित असेल. पुस्तक बाजुला करुन गोड हसला. मी सोफ्यावर स्वतःला झोकुन दिलं. तो पाणी आनायला आत गेला. 


(याची बायको जाम लकी असनार आहे. न मागता पाणी स्वर्गच) मी विचार करत होते.


'काळजी नको करुस लग्नानंतर घराची जबाबदारी वाटुन घेतली जाईल.' 

तो मला पाणी देत बोलला.


(मी काय विचार करतेय याला कसं कळलं. पण नाही, मनकवडा आहे तो.)


'तुला काय माहीत मी काय विचार करते? तुझं आपलं काहीतरी. एक मिनिट म्हनजे तु लग्नाचा विचार करतोय तर?' 

मी हि एक भुवई वर करुन त्याला विचारलं.


त्याने हसून मान खाली घातली. मी त्याला निरुत्तर केलं होतं, मी स्वतःवर आनंदी झाले होते. पण तो फार काळ टिकला नाही.


'माझं लग्न झालं तर तुला अस इथं येता येनार नाही ना?'त्याचा प्रतिप्रश्‍न मला हादरवुन गेला. मी काहीवेळासाठी सैरभैर झाले.


'मग नवीन व्यक्ती??' तो काहीच झाले नाही या अशा अविर्भावात बोलला.


पण मी ठरवलं होतं त्याला पुन्हा कधी विचारायचं नाही म्हणून मी ही नविन व्यक्ती ऐकायला स्वतःला तयार केलं.


वृंदा...!


शहरापासुन दुर एका डोंगराळ गावात राहनारी १९ वर्षाची. अल्लड, निरागस पण तितकीच हुशार मुलगी. जशास तसं उत्तर देनारी. १० वी नंतर शाळा संपली मग काय दुसर्‍याच्या शेतात काम आणि रोजंदारी. सोबतच्या मैत्रिणींचे लग्न झालेले. पण तिच्यासाठी कोणी विचार करेना. गावातल्या लोकांच्या नजरेत ती भरत होती.


तिच्या आईला सतत विचारायची,

'माझं कधी व्हईल लगीन, समद्यांची झाली.' 

आई तिच्या प्रश्नांना उत्तरे देनं टाळायची. 


घरात त्या दोघींच असायच्या. तिच्या भावनांनाही आता वेग घेऊ लागला होता. पण ती एक देवदासी होती. जोगवा मागत फिरनारी. तिला समाजाने दिलेला हा शब्द मान्य नव्हता. ती स्वैर होती. अशातचं ती या शब्दांना, लोकांच्या नजरेला कंटाळुन आईला घेऊन शहरात आली. इथेही लोक बदलले नव्हते. पण तिने हिम्मत हारली नाही. तिच्यासारख्या कित्येक मुलींना तिने तो तिरस्कार भोगु दिला नाही. आज ती नाही काही तर गरिब मुलांना, वंचीत स्त्रियांना योग्य ते धडे देते. ती आजही कनखरपणे उभी आहे अन्यायाविरुद्ध.


हे सगळं सांगताना त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक होती.


'तुला माहीतिये, वृंदा म्हणजे तुळशी. पवित्रतेचे दुसरे नाव. ती ही अशीच आहे. तिच्यापुढे गेल्यावर नजर खाली जातेच. अंगनातल्या तुळशीसमोर हात जोडुन उभं राहिल्यावर जसं वाटतं ना तसचं तिच्यासमोर उभा असतांना वाटतं.' 

तो धुंदित बोलत होता.


किती समजतो हा सगळ्यांना. मात्र स्वतःच्या मनाचा ठाव लागु देत नाही. डोळे अनेकदा खुप बोलतात पण शब्द ते तर तो शिताफीने बदलतो. मी खरतर वृंदाबद्दल ऐकुन भारावले होते. मला माहीत होतं मला त्रास होऊ नये म्हणून त्याने बरेच मुद्दे माझ्यापासून लपवले असनार. पण वृंदा स्वतः एक कणखर स्त्री होती. हा नक्की तिला भेटला असनार.


'मी वृंदाला सांगितलं तुझ्याबद्दल....!' तो शांतता आणि माझे विचारशृंखला भंग करत म्हणाला.


'काय?' मी ही आश्चर्यात विचारलं.


'हेच की माझी एक मैत्रीण आहे. अल्लड, निरागस आणि प्रेमळ.' तो लाघवी हसत म्हणाला.


'अरे हो विसरलोच. वृंदाने गिफ्ट दिलय तुझ्यासाठी.' यावर मी खुप खुश झाले. तो उठून बाहेर गेला आणि एक टवटवीत तुळशीच रोप घेऊन आला. मला क्षणभर काही सुचेना. इतकं सुंदर गिफ्ट माझ्यासाठी होतं. त्याने नाजुकपणे ते रोप माझ्या हातात दिलं.


'वृंदाने वृंदा दिलीये....' त्याला अजुन पुढे काही बोलायचं होतं मात्र तो संयम राखत तेथेच थांबला.


मी बाहेर येऊन बाजुला अडगळीत ठेवलेले तुळशी वृंदावन बाहेर काढलं. त्यात माती भरुन त्यात रोप लावलं. तो दारातुन हसत माझ्याकडे पाहत होता. मी पुन्हा आत येऊन सोफ्यावर बसले. मघाशीचा प्रश्न आता त्रास देऊ लागला होता.


'तु असं का म्हणाला की...' मी संकोचित होऊन विचारलं.


'की काय? हेच ना की, माझं लग्न झाल्यावर तु इथे अशी येऊ शकनार नाही म्हणून?' तो त्याचं हसु रोखत म्हणाला.


'हो' मी जवळजवळ ओरडलेच. तो तसाच हसत किचनमध्ये जाऊ लागला. मला अजुन राग आला, की वाईट वाटलं समजेना.


'तु इथेच असतांना तुला इथं येण्याची गरज का लागेल' माझ्यासमोर निरंजन ठेवत तो बोलला. चेहर्‍यावर नेहमीच स्मित आणि शांतता होती. माझ्या चेहर्‍यावर हसू उमटलं. मी निरंजन घेऊन तुळशीपुढे दिवा लावला. संध्याकाळ झाली होती. पण तरीही सगळं उजळून निघालं होतं.

वृंदा आमच्या आयुष्यात प्रकाश घेऊन आली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance