Priya Jawane

Abstract Romance Fantasy

3.2  

Priya Jawane

Abstract Romance Fantasy

तो अ‍ाणि ती - "सुरुवात...!"

तो अ‍ाणि ती - "सुरुवात...!"

5 mins
279


गुलाबाचा सुगंध दरवळत होता. . . . .

सगळीकडे कलकलाट होता. . . . . .

अनेक रंग उधळले जात होते. . . . . .

हसण्याबोलण्याचा आवाज कानात घुमत होता. . . . . .

फुलांची चादर पसरलेली होती. . . . . .

अनेक कोमल मोरपिस प्रत्येक स्पर्शात जाणवत होते. . . . . .

अग्निकुंड ज्वलंत झालं होतं. . . . .

अनेक मंत्र, वेदी ब्राम्हणांच्या, गुरुंच्या तोंडून ऐकू येत होत्या. . . . .

सनई वाजत होती. . . . . .

मी नजर उठवून त्याला पाहीलं. . . . . आणि माझी झोपमोड झाली. पहाट झाली होती. आमच्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीची पहाट. आज लग्न होतं आमचं. सगळं स्वप्नवतच. हे स्वप्नही पहाटेच. पहाटेचे स्वप्न खरे होतात. पण आज स्वप्नच सत्य होणार होतं.


माझी रुम रंगीबेरंगी जरबेला फुलांनी सजवली होती. मी उठून बसले. सबंध रुम मध्ये मेहंदी आणि हळदीचा सुवास पसरला होता. माझ्या हातावर अर्जुनच्या नावाची मेहंदी होती. कालच त्याची उष्टी हळद लागली होती. माझ्या हातात हिरवा चुडा होता. पिवळ्या धाग्यात हळकुंड होतं. चेहर्‍यावर हळदीपेक्षा जास्ती अर्जुनच्या प्रेमाची चमक होती. मी स्वतःला आरशात पहात लाजले. 


थोडा वेळ खिडकीत येऊन बसले, समोर पुर्ण चंद्र होता, प्रखर, तेजस्वी प्रकाश पसरवत होता. तो शितल प्रकाश मला हवा हवासा वाटू लागला होता. पण पुर्वेकडची लाली नव्या आयुष्याच्या सकाळची सुरुवात करण्यास आतूर होती.


माझा पुर्ण शृंगार अर्जुनने स्वतः पसंत केला होता. सोनेरी आणि लाल रंगाची साडी. मेहंदी, हळदीची काया, पायातले पैंजण, कंबरपट्टा, हातातल्या अंगठ्या, ब्रेसलेट, बांगड्या, झुमके, बाजुबंद, गळ्यात तीन मोठे हार, कानातले, त्यालाच जोडून केसांच्या साखळ्या, बिंदी, नथ आणि खुप सारे मोगर्‍याचे गजरे अर्थातच जवळकर काकांच्या बागेतल्या फुलांचे.


"ये आयना भी बडा़ दगाबाज हैं,

चेहरा हमारा अैार दिदार उन्हीका कराता हैं।

हम तो शर्मसे पानी पानी हो गये,

ये अब भी उनकी झलक याद दिलाता हैं।"


माझं पुर्ण आवरुन होईपर्यंत मी डोळे उघडले नव्हते. शृंगाराची जादू, दागिण्याची चमक आणि त्याच्या प्रेमाची लाली, मी आरशात स्वतःला पाहत होते. कुठेतरी स्वतःच मी स्वतःसाठी अनोळखी झाले होते. ही त्याची पिऊ होती, जी त्याच्या स्वप्नात होती. आज त्याला मी वास्तवात सोपवनार होते. त्याचा हक्क, त्याचं प्रेम पुर्णत्वाला नेणार होते. ह्रदयाची धडधड खुप वाढली होती. आरश्यातल्या मी ला नजर देऊ शकत नव्हते. वेगळीच बेचैनी होती ती. पोटात अनेक फुलपाखरं एकाच वेळी गुदगुल्या करित असावे असा भास होता.


लग्नाच्या हॉलपर्यंत जातांना सतत त्याचा विचार होता. आज आमच्या नव्या नात्याची सुरुवात होती. माझी गाडी हॉलच्या गेट वर थांबली. मी अजुनही भानावर नव्हे. अर्जुन बाहेर माझी वाट पाहत होता. सोबत वृंदा, जवळकाका, अर्जुन चे मित्र आणि आश्रमातल्या काही स्त्रिया होत्या. 


तो मला घ्यायला गाडीजवळ आला. मी अजूनही विचारातच होते. दरवाजा उघडून त्याने हात दिला तशी मी भानावर आले. त्याच्या हातात मनापासून हात देऊन मी गाडीतुन उतरले तसा फुलांचा वर्षाव सुरु झाला. मी त्याच्या नजरेत खेळले. लाघवी हसत तो माझ्याकडे एकटक पाहत होता. माझा हात अजुनही त्याच्या हातात होता. तो क्षण थांबला होता आमच्यासाठी.


"ओठावे नाव तुझं

मनी भाव तुझे

आज सजले तुझ्यासाठी

सावरले फक्त नाते नाही

मन आणि स्वप्नही माझे

सख्यारे तुझीच मी

माझा होशिल का रे"


अर्जुनने बदामी रंगाचा सुट, सोनेरी पगडी आणि वरच्या खिशात लाल रंगाचा रुमाल होता. आमच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं पण ते आनंदाने. मंडपापर्यंत जातानाही हात सुटला नाही. अक्षतांचा, फुलांचा पाऊस पडत होता. रंगाची रांगोळी होती प्रत्येक जागी. फुलांची चादर होती पायाखाली. स्टेजवर मंगलअष्टकांसाठी वेगळे झालो मात्र ते अंतर अंतरपाटाने झाकलं गेलं होतं. 


"पवित्र नातं ते आपलं

स्विकारलं मनापासूनी

हातात देऊनी हात तुझ्या

विसरली स्व ही साजनी"


लग्नाच्या वेदीवर अनेक स्वप्न बनतात पण माझं स्वप्न माझा हात घट्ट पकडून माझ्यासोबत होतं, अर्जुनच्या रुपाने. ब्राम्हण मंत्र उच्चारत होते तस तशी मी स्वतःला अर्जुनच्या अधिकाधिक जवळ जाणवत होते. मंगळसुत्र आणि कुंकवाने त्या प्रेमात अधिक भर टाकली होती. सात फेरे भलेही अग्निला साक्ष धरुन असतिल पण ते घेतांना धरलेला हात विश्वास आणि प्रेमाची साक्ष देत होता.


सोबत आम्ही अनेकदा जेवलोय. पण आजच जेवण वेगळाच गोडवा जाणवून देत होता. पाठवनीला डोळ्यात पाणी होतं पण सोबतच आयुष्यभराची साथ मिळनार हा आनंदही होताच.


अर्जुनच्या आणि आता माझ्याही घरी पोहचलो ती भावना व्यक्त करने अवघडच. मी अनेकदा इथे येत होते पण आज काहीतरी मनाला सुखवत होतं. आजचा माझा गृहप्रवेश अर्जुन ची पिऊ या रुपात होत होता, त्याची सहचारिणी म्हणून होत होता.


पुढचे काही दिवस पुजा, देवकार्य करण्यातच गेले. आज सगळे पाहूनेही आपआपल्या घरी गेले. आमच्या जगात आता आम्ही दोघचं होतो. मी किचनमध्ये होते. अर्जुन संध्याकाळपासून रुममध्ये होता. मी अजूनही आमच्या रुममध्ये गेले नव्हते.


मनात धाकधुक वाढत होती. श्वास वाढत होते. भिती होती. संवाद केवळ नजरेने चालत होता. शब्दांची गरज नसायची अनेकदा. जेवण झाल्यावर अर्जुन जिन्यांकडे जातांना फक्त एकदा माझ्याकडे पाहत हसला.


थोड्यावेळात मी हि संथ पावलाने वरती आमच्या रुम मध्ये निघाले. ह्रदय जोराने धडधडत होतं. रुममध्ये पाऊल टाकला तसा अर्जुनने खाली बसत तो हातावर झेलला. मी सावरून उभी राहिले. 


'मला आज पैंजणांचा आवाज नकोय' 

तो शांततेत माझे पैंजण काढत बोलला. मी लाजुन डोळे बंद केले.


रुम त्याने फुलांनी सजवली होती. अनेक मेनबत्त्या तिथे जळत होत्या. एक मनमोहक सुवास दरवळत होता. खिडकीच्या बाहेरुन पौर्णिमेचा चंद्र आम्हाला अडसर करत डोकावत होता. हवा वाहत होती, पडदे उडत होते. विंडचेन चा आवाज सुखावत होता. तो शितल प्रकाश हवासा वाटत होता. त्यात भर सुखद, आनंदाच्या हुंकारांची. गार वारा अंगाला झोंबणारा होता. अर्जुन त्याचं प्रेम उधळत होता आणि मी त्या रंगात अधिकाधिक खुलत होते. आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली होती. हे नातं असंच बहरत जाणार होतं. आज खर्‍या अर्थाने तो माझा आरसा अन् मी त्याची सावली बनले होते.


"एक प्यार का नगमा है मौजों की रवानी है. . . 

ज़िंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है. . .

एक प्यार का नगमा है ला ला ला. . .


कुछ पाकर खोना है कुछ खोकर पाना है. . .

जीवन का मतलब तो आना और जाना है. . .

दो पल के जीवन से इक उम्र चुरानी है. . .

ज़िंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है. . . 

एक प्यार का नगमा है. . . 


तू धार है नदिया की मैं तेरा किनारा हूँ. . . 

तू मेरा सहारा है मैं तेरा सहारा हूँ. . . 

आँखों में समंदर है आशाओं का पानी है. . . 

ज़िंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है. . .

एक प्यार का नगमा है. . .


तूफ़ान को आना है आ कर चले जाना है. . .

बादल है ये कुछ पल का छा कर ढल जाना है. . .

परछाईयाँ रह जाती रह जाती निशानी है. . .

ज़िंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है. . .


जो बीत गया है वो अब दौर न आएगा. . . 

इस दिल में सिवा तेरे कोई और न आएगा. . .

घर फूँक दिया हमने अब राख उठानी है. . .

जिंदगी और कुछ भी नही तेरी मेरी कहानी है. . .


एक प्यार का नगमा है मौजों की रवानी है. . . 

ज़िंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है. . .

एक प्यार का नगमा है मौजों की रवानी है. . ."


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract