Priya Jawane

Romance Fantasy

3  

Priya Jawane

Romance Fantasy

तो आणि ती - "मुखवटा...!

तो आणि ती - "मुखवटा...!

5 mins
247


घरात लग्नाची गडबड सुरु होती. लग्न चार महिन्यांनंतर असल तरी खरेदी, बुकिंग, आमंत्रण याची सुरुवात झाली होती. रोज सकाळी हातात कामाची यादी पडायची. कामात सगळ्यांचा वेळ जायचा, माझा सोडून. मी शांत बसलेली असायचे कोणासोबत न बोलता. सगळे म‍ाझ्याच लग्न‍ाच्या घाईत पण मी मला कुठे जाणवायचे नाही. अचानक अनेक बंधन, जबाबदार्‍या पडल्या सारख्या वाटायच्या. 


आजची सकाळही अशीच घाईची होती. अर्जुन सोबत फोनवर काय ते बोलणं, ते ही पुर्वीसारखं नाही. अचानक दोघांमध्ये काहीतरी आलं होतं.कदाचित नाव, नात्यांच नाव. या सगळ्यात माझा सोबती माझा मितवा माझा अर्जुन कुठेतरी हरवला होता, की मी हरवले होते या शब्दांच्या गर्दीत?? विचारांनी डोक जड झालं होतं, यावर उपाय एकचं, माझ्या प्रश्नांची उत्तरे. लगेच बॅग घेतली आणि गाडी काढली. मम्मी ला आलेच म्हणून निघालेही. 


(खुप सारे प्रश्न होते मनात, सल्ले होते आणि अजुन काहीतरी अरे हो नातं, ते होतं आता.)


सवालों के घेरो में कोई जबाब चाहीये हमें।

भीड बॉहत है यहाँ साथ चाहीये हमें।

हम तो यु हि चल दिये इस राह पें,

ठोकरोसें पेहले उन्हे दुर करनेवाला चाहीयें। 


त्याच्या घरासमोर गाडी लावली. हे घर मला आता वेगळीच आपुलकी जाणवून देऊ लागलं होतं. दार नेहमीप्रमाणे उघडच होतं, तो घरीच होता. सगळे झाडं जणू स्वागतासाठी तयारच होते. तुळशी बहरलेली होती. निरंजन तेवत होती. मी हळूवार आत गेले. किचनमध्ये भांड्यांचा आवाज आला. मी सोफ्यावर स्वतःला झोकून दिल. थोड्यावेळात दोन कप चहा घेऊन तो समोर आला. डोळे स्वच्छ सफेद होते. हल्ली शांत झोपत असावा. 


इथे ती धावपळ नव्हती. लग्नाची तयारी अशी त्याच्याकडून नव्हती. त्याने सहज सोप्या भाषेत सांगितलं होतं माझ्याकडून माझे जवळचे लोक येतील फक्त. त्याचं सगळं मी पाहील तुम्ही काहीही त्रास घ्यायचा नाही. लग्न कमी खर्चात आणि साधं व्हावं. पण माझाच हट्ट होता, सगळ्या रितीरिवाजांचा. आणि मी च कुठे त्यात गुरफटत चालले होते.


मी नेहमीप्रमाणे पाय वर घेत पालथी मांडी घालून बसायचा प्रयत्न केला पण आपसूक पाय पुन्हा जमिनीवर टेकले. मी त्या सोफ्यावर अवघडून बसले होते. मी पाय खाली घेतलेले अर्जुनने पाहीले. त्याने थोड्या विचारातच माझ्याकडे पाहिलं. मला चहा दिला.


'मला सांगायचा ना मी केला असता!' मी कप हातात घेत थोडी घाबरुन बोलले.


'काय होतय? काय झालयं?' त्याने प्रश्न केला.


'तुम्ही जेवण केलं?' मी नकळत प्रश्न केला. कदाचित तो काय म्हणाला हे मला समजले नव्हते. त्याने चमकून माझ्याकडे पाहिलं. 


'तुम्ही???' त्याने डोळे मोठे करत जोर देऊन विचारलं. मी डोळे बंद करुन खाली मान घातली. तो उठून माझ्याशेजारी सोफ्याच्या आर्मरेस्टवर येऊन बसला. मी त्याच्या हातावर डोक टेकलं. डोळे अजुनही बंद होते, पण पाणी वाहत होतं, त्याने हाताच्या मागच्या बाजूने ते पुसले.


'खूप सल्ले आहेत. तू नाही तुम्ही बोल. आवजाव कर. जास्त बोलू नको, भेटू नको, नीट बसत जा, काम सांगु नको, हट्ट करु नको आणि यांसारखे अनेक.' 

मी बोलतच होते. तो मात्र शांत ऐकत होता.


'मी हरवत चालले या सगळ्यात. . . . ." मी हताश होत बोलले.


'मग नको मनावर घेऊ. . . .' तो तितक्यात शांततेत म्हणाला. मी प्रश्नार्थक नजरेने त्याला पाहील.


'तु इथे अ‍ाल्यावर आजपर्यंत जमिनीवर पाय ठेवले नाहीत. कायम सोफ्यावर मांडी घालून बसतेस मग आज का? तु इथे निवांत शांत होऊन झोपलीये मग आज अवघडलेली का? इथे आल्यावर भुक लागली म्हणून हवं ते मागतेस मग आज मी चहा आणला तर तुला वेगळं का वाटतयं?' तो मला प्रश्न करत होता. आणि उत्तर माझ्याकडे नव्हते.


'बाकी कोण काय बोलतयं यापेक्षा तु काय विचार करतेय मला हे जास्त गरजेच आहे. मला पिऊ हवीये, माझी पिऊ. सगळं शिकून बाकीच्यांसारखं वागणारी बाहूली नाही.' तो शांततेत पण जरब देऊन बोलला.


'काय बदललंय? फक्त नातं? मग काय आता सगळचं बदलायचं का?' तो विचारत होता आणि मी शांत होते.


'मी चुकतेय?' मी त्याला प्रश्न केला.


'हो' त्याने दिर्घ श्वास घेत उत्तर दिलं. मी झटकन उभी राहीले. तो माझ्या जवळ आला. 


'मिसेस अर्जुन बनतांना माझी पिऊ तु हरवतेय ही चुक आहे तुझी. मला माझी पिऊ हविये. माझी मैत्रिण, कोणी औपचारिकता सांभाळनारी व्यक्ती नाही. तु इथे बागडतेस म्हणून मी हि खुलतो. पण मला आता सतत तु हविये तशीच बागडनारी, अल्लड, भुक लागल्यावर तनतन करणारी चिडचिडी. माझी पिऊ.'


तो हसत पण गुंग होत बोलत होता. मला माझ्यातली मी कुठेतरी पुन्हा गवसली होती. मी जशी आहे तशीच त्याला हवी होते. कुठलाही मुखवटा लावून त्याला मी आवडनार नव्हते. मी ही तो अौपचारिकतेचा मुखवटा आता फेकला होता. आमच्या नात्याला फक्त नाव मिळाल होतं पण आम्ही अजुनही त्याच वाटेवर होतो जिथे स्वातंत्र्य होतं, आपुलकी होती, काळजी होती आणि प्रेम होतं कोणत्याही मुखवट्याशिवाय.


त्याने त्याचे ओठ माझ्या माथ्यावर टेकले. मी डोळे मिटले. मला त्याने पुन्हा सोफ्यावर बसवलं. पण यावेळी मी पाय वर घेऊन बसले जशी मी नेहमी बसायचे. मला पाहून तो लाघवी हसला. आत जाऊन त्याने एक मोठा गिप्ट बॉक्स आणला.


'आपल्या लग्नानिमित्त माझ्यातर्फे तुझ्यासाठी' मी हसत तो बॉक्स त्याच्या हातून घेतला. त्याला माहीत होतं मी तो लगेच उघडनार म्हणून.


आत एक मोरपंखी रंगाची साडी, बांगड्या आणि एक स्केचबुक होतं. मी स्केचबुक हातात घेऊन बाकीच खाली ठेवलं. अर्जुन काहीतरी माहीत असल्यासारखा हसला. त्या स्केचबुकमध्ये अनेक पेन्सिल स्केच होते, माझे. माझ्यातल्या त्याच्या पिऊचे. गुलाबाचा वास घेणारी पिऊ, पावसात भिजलेली, नकळते भाव, पेंटिंग पहातांना, तुळशीसमोर निरंजन लावतांना, विचारात गुंग असताना, त्याचा हात घट्ट पकडून बसलेली पिऊ आणि सगळ्यात शेवटी त्याने लग्नाचा प्रस्ताव मांडल्यावर लाजून नजर खाली नेणारी पिऊ. सगळं त्याने मनापासून रेखाटलं होतं. मी आनंदाने भरलेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहीलं. नकळत डोळे मिटून त्याच्या खांद्यावर डोक टेकवलं.


'आवडलं?' त्याने संयमाने विचारलं.


'हम्म' मी तसच राहून उत्तर दिलं.


'प्री वेडींग फोटोशुट करुन मुखवट्यासोबत खोटे हावभाव तर दाखवता येतील पण मला फोटो नाही आठवणी जपायला आवडतात.' तो हक्काने बोलत होता. आम्ही किती वेळ बसलो होतो आठवत नाही पण हो मला माझ्यातली त्याची मी नक्कीच सापडले होते. परत माझी पिऊ हरवून देऊ नको असं बजावायलाही तो विसरला नाही. मला सोडायला आज गेटपर्यंत आला. 


'निघतेय???' त्याने गेटच्या बाजुच्या भिंतीवर एक पाय दुमडून रेलत विचारलं.


'परत येण्यासाठी. . .' मी ही हसत उत्तर दिलं. जवळचं कुठेतरी रे़डिओवर माझं आवडतं गाणं सुरु होतं.


हो गुम है किसी के प्यार में दिल सुबह शाम. . .

पर तुम्हे लिख नहीं पाऊँ मैं उसका ना. . .

है राम ही राम सुबह शाम. . . . 


हो सोचा है एक दिन मैं उससे मिलक. . .

कह डालूं अपने सब हाल दिल के. . .

और कर दूं जीवन उसके हवाले. . .

फिर छोड़ दे चाहे अपना बना ले. . .

मैं तो उसका रे हुआ दीवाना. . .

अब तो जैसा भी मेरा हो अंजाम. . .


चाहा है तुमने जिस बावरी को. . .

वोह भी सजनवा चाहे तुम्ही को. . .

नैना उठाये तो प्यार समझो. . .

पलकें झुका दे तो इकरार समझो. . .

रखती है कब से छुपा छुपाके. . .

अपनी होंटों में पिया तेरा नाम. . .


गुम है किसी के प्यार में दिल सुबह शाम. . .

पर तुम्हे लिख नहीं पाऊँ मैं उसका नाम. . .


तिथून निघावं असं मलाही वाटत नव्हतं पण कायमच इथे येण्यासाठी आता तिथून मला जाव निघावं लागनार होतं. मी नजरेआड होईपर्यंत तो पाहत असनार हे माहीत होतं. आता माझ्या मनात प्रश्न नव्हते. त्याची पिऊ त्याला हवी तशीच मला त्याला सोपवायची होती. अचानक सगळं हलकं हलकं वाटू लागलं. मी आता माझी राहीले नव्हते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance