Priya Jawane

Abstract Romance Fantasy

3  

Priya Jawane

Abstract Romance Fantasy

तो आणि ती - "अबोल शब्द...!"

तो आणि ती - "अबोल शब्द...!"

5 mins
271


हूं हा हा हा हा हा हा


होश वालों को खबर क्या बेखुदी क्या चीज़ है 

इश्क़ कीजे फिर समझिए ज़िंदगी क्या चीज़ है

होश वालों को ... 


उनसे नज़रें क्या मिलीं रोशन फ़िज़ाएं हो गईं 

आज जाना प्यार की जादूगरी क्या चीज़ है 

होश वालों को ... 


खुलती ज़ुल्फ़ों ने सिखाई मौसमों को शायरी

झुकती आँखों ने बताया मैकशी क्या चीज़ है 

होश वालों को ... 


हम लबों से कह न पाए उनसे हाल-ए-दिल कभी 

और वो समझे नहीं ये ख़ामोशी क्या चीज़ है 

होश वालों को ...


म्युझिक प्लेअरवर ही गजल ऐकत बसलो होतो. मनात फक्त पिऊ होती. खरतर ही गजल आमच्या नात्याला साजेशी होती. भाव होते पण शब्द सापडत नसायचे पण आता न बोलताही ती अनेक भाव समजायला लागली होती. माझी इच्छा आता ती माझ्याही आधी अोळखून होती.


मी सोफ्यावर शांत बसलो होतो. तिला फोन करावा, भेटावं असं सारखं वाटायचं. एकांत नकोसा झाला होता आता. या घरात सजीव असा मी च होतो, पण मी च मला सजीव वाटेनासा झालो. तिच्याविषयी अोढ खुप वाढली होती. अनेकदा भिती वाटायची ती समोर आली अन् संयम ढळला तर, पण नाही ती माझी पिऊ होती. जी आता माझीच होणार होती. वाट पाहनं, झुरनं प्रेमात तर होणारचं. मी अनेकदा संयम ढळायच्या आत तडक उठून निघून गेलोय, तीने कधी याविषयी तक्रार केली नाही. आणि या पुढे मी तिला तक्रारीची संधीही देनार नव्हतो.


घरात अनेक बदल मी केले होते. तिला आवडतील असे. तिचं अस्तित्व सतत जाणवायचं मला त्या बदलांमध्ये. आठवणीतला मी मलाच अनोळखी झालाे होताे. किती बदललोय मी, आणि ती ही बदललीये, माझ्या रंगात पुर्णतः ढळलीये. घरात फक्त प्रकाश आहे सध्या, काही दिवसात या प्रकाशाचाही त्रास होईल. अंधार, सावल्या हव्या हव्याशा वाटतील.


मी माझी खोली पुर्ण बदललिये. पुर्वी तिथे फक्त संपलेले किंवा संपत चाललेले रंग असायचे, आता ते रंग संबंध खोलीभर उधळले होते. पुर्वेला असणारी मोठी खिडकी रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी सजवली होती. तिला आवडणारे सौम्य रंगाचे पडदे त्यावर चांदण्याची माळ होती. आरसा रंगीत तोरणांनी सजवला होता. छतावरच झुंबर हलकीशी किनकिन करायचं. बाहेरच्या गॅलरीत लावलेलं विंड चेन वार्‍याच्या वेगासरशी सुरेख आवाज करायचं. गॅलरीत तिला आवडणारे सगळे वासांची फुल होती, खास करुन रंगीबेरंगी गुलाब. आणि आमचा बिछाना, तो तर गडद लाल रंगाची उधळन करत होता. त्या खोलीत सगळ्या वस्तूत तो प्रेमाचा रंग पसरवत होता.


मी पुन्हा हॉलमध्ये आलो. गेटचा आणि पैंजणांचा आवाज आला. पिऊ आली होती. किचनमधून तिच्यासाठी पाणी आणून ठेवलं. मी बाहेर जाईपर्यंत ती आत आली होती, दमली होती. पाणी घेऊन सोफ्यावर बसली. हातात खरेदीच्या अनेक बॅग होत्या.


'काही खरेदी लग्नानंतरही करावी.' 

मी तिला उगाचच त्रास देण्याच्या उद्देशाने म्हणालो.


'आर्या साठी सामान आणलयं'

ती माझ्याकडे रागात पाहत म्हणाली.


मला खर तर तिच्या बोलण्याचं हसू आलं. मला हसतांना पाहून ती अजुन चिडली. आमचं आयुष्य असच जाणार होतं कदाचित. 


'भुक लागलिये. . .' 

ति काकुळतीला येऊन म्हणाली.


(अरेच्चा मावशी आज आलेल्या नाहीत.काही तरी पटकन बनवाव लागेल.)


मी विचारातच किचन कडे वळालो.


'प्लेट्स आण फक्त मी पार्सल आणलयं.' 

तीने हुकूम सोडला.


मी प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहीलं.


'मावशींचा फोन आला होता त्या आल्या नाहीत म्हणून, तु जेवणार नाहीस मग म्हणून मीच पार्सल घेऊ आले. बाहेर होते नाहीतर घरुन टिफिन आनला असता. बरं ते जाउ दे ना, भुक लागलीये.' 

ती बिना ब्रेकच्या गाडीसारखी बोलत होती. आणि मी फक्त तिचे बोल ऐकत होतो. 


सगळीकडे चैतन्य पसरलं होता. थोड्यावेळापूर्वीचा निर्जीवपणा नाहीसा झाला होता. तिने एखादी जादूची कांडी फिरवावी तस सगळं मला खास वाटायला लागला. मी तशीच जाऊन तिला मिठी मारली. ती स्तब्ध झाली. थोड्यावेळाने सॉरी म्हणून किचनमध्ये निघून आलो.


ती सोफ्यावर खाली बसली. मी किचनच्या पडद्यामधून तिला पाहत होतो. ती लाजत, दाताखाली अोठ दाबत, डोळे घट्ट मिटून बसली होती. अंतर होतं आणि ते ठेवावच लागनार होतं. पहिले ती आली तर एवढा बैचेन होत नव्हतो, पण मागिल काही दिवसात हा बैचेन, बालिशपणा वाढला होता माझा.


दोघांनी जेवण सोबत घेतलं. कोणीही काही बोलत नव्हतं. नजरही मिळवतं नव्हतो. अचानक नजरेला नजर मिळाली कि नजर चोरायचो.


"ये क्या गुनाह हो गया हमसे ऐ खुदा

हुस्न सामने है अौर हम दिदार को तरसे है।

ये कुछ पल की दुरी कहीं जान ना ले ले हमारी,

बस उस वक्त यार खफा़ ना हो, 

हमारी इस बेरुखी कि वजेसे।"


जेवण झाल्यावर ती नेहमीप्रमाणे पाय वर घेऊन बसली. हात हनुवटीखाली घेत आर्मरेस्ट वर टेकवुन माझ्याकडे पाहत. तिला नक्की कोणी व्यक्ती ऐकायची होती.पण माझ्याकडे सांगण्यासारखं काही नव्हतं. कारण हल्ली माझ्या आयुष्यात फक्त ती होती.


'आज नाहीये काही सांगायला' 

मी तिच्यासमोर सोफ्यावर बसत म्हणालो. तशी तिने मान फिरवली. हल्ली अनेकदा ती शब्दांऐवजी कृतीतून किंवा नजरेतून बोलु लागली होती. आमच्यातला संवाद हा अधिकच दृढ होत चालला होता.


मला ती पिऊ आठवली जिला मी पहिल्यांदा भेटलो होतो. . . . . . .


साधारण २ ते ३ वर्षापुर्वी. . .


सकाळपासून पाऊस बरसत होता. सगळीकडे नुसता चिखल आणि गर्दी होती. मी रिसर्चसाठी लागणारी काही महत्त्वाची पुस्तके आणायला निघनार होतो. पुस्तकांची अॉर्डर आधीच दिलेली असल्याने फक्त जाऊन आणने ऐवढेच काम होते. मी गाडी गर्दित न घेता आड रस्त्याने घेतली.थोड लांब पडत असल तरी ट्रॅफिक टाळता येऊ शकत होती. माझ्यासारखा विचार करण्यार्‍या अनेक मंडळींनी मात्र इथेही गर्दी केली होती. मात्र गाड्या थांबल्या होत्या त्या ट्रॅफिकमुळे नाही तर. . . 


एक पांढरा शुभ्र सुट, बांगड्या घातलेली एक मुलगी एका आंधळ्या आजींना रस्ता अोलांडायला मदत करत होती. पावसामुळे तीचे मोकळे केस पुर्ण भिजले होते. मला तिचा चेहरा दिसत नव्हता पण तिची कृती तिची सुंदरता सांगायला पुरेशी होती. थोड्या वेळाने ती ही तिच्या गाडीवर निघून गेली. मी काही मख्ख सारखा तिच्या सौंदर्याकडे पाहत होतो. मागच्या गाडीने हॉर्न दिला तसा भानावर आलो. का माहीत नाही पण डोक्यात कुठेतरी काहीतरी क्लिक झालं. अशी भावना कधीच कोणाबद्दल झाली नव्हती. अोढ होती की पहिल्या नजरेच. . . .


पुस्तकांच्या दुकानात माझे पुस्तके घेऊन निघनार कि पावसाने पुन्हा बरसन सुरु केलं. गाडी दुर लावली होती. भिजत जाणं जमनार नव्हतं. पुस्तकांच्या रांगांमध्ये असाच फिरत होतो. पुन्हा ओझरता नजारा पाहीला, तिचाच. जागेवर थांबुन पुन्हा पाहीलं. तोच पांढरा शुभ्र सुट, बांगड्या. पण यावेळी चेहराही. ती नक्कीच तीच आवडतं पुस्तक शोधत होती. मी वेंधळ्यासारखा तिच्याकडे पाहत होतो,अगदी दहा फुटांवरून. तिला जाणवलं असणार, तिने झटकण माझ्याकडे पाहिलं. त्या क्षणांसाठी सगळं जग जागेवरच थांबलं होतं माझ्यासाठी तरी. गडद तपकीरी रंगाचे पाणीदार डोळे, उठावदार रंग, कमान करणारे केस, हनुवटीवर नाजुक खड्डा त्या सौंदर्याचं वर्णन शब्दात करणं हा केवळ प्रयत्न. 


तिच्या हातात काही पुस्तक होती. नजर माझ्यावर रोखलेली. मला ते भाव वाचता येणं कठिण होतं. काही वेळात मलाच माझा प्रताप लक्षात आला आणि मी भर पावसात तिथून काढता पाय घेतला.


पुढे माझ्या एका बिझीनेस असोसिएट्सची ती मुलगी निघाली. एका सेमिनारला पुन्हा भेट झाली, यावेळी शब्दांसोबत. तिने हसून स्वागत केल. खुप बोलली. पिऊ माझी पिऊ. हळूहळू भेटी वाढल्या, संवाद वाढला, मन जुळली आणि आता नातंही.


आता,,, ती सोफ्याच्या बाजुला तोंड फिरवून बसली होती. पण काही वेळातच पुन्हा ठिक झाली. तिने तिच्या लग्नाविषयी च्या अनेक भावना सांगितल्या. मी फक्त तिला ऐकत होतो. ती एखाद्या मुक्तहस्त चित्रासारखं रंग भरत होती माझ्या आयुष्यात. तिने माझा भुतकाळ केव्हाच तिच्या प्रेमाच्या रंगानी भरून काढला होता. मी फक्त वाहत होतो तिच्या प्रवाहात. हि सुरुवात होती नव्या सकाळची. माझ्या पिऊ सोबत, आमच्या आर्यासोबत.


"मुश्किले बॉहत आयी जिंदगीमें,

बस अब तेरा साथ चाहीये।


हर लढाईमें जीत लायेंगे,

बस अब तेरा साथ चाहीये।


हर खुशी हर गम में'

अब बस तेरा साथ चाहीये।


इन सांसो के हर खुशबू में,

बस अब तेरा साथ चाहीये।"


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract