Pandit Warade

Horror

3  

Pandit Warade

Horror

ती वाट बघत्येय-५

ती वाट बघत्येय-५

4 mins
120


ती वाट बघत्येय-५


    महाराजांना हवा असलेला तो कागद सापडला. त्यांची मुद्रा उजळली. तो कागद ते बारकाईने वाचायला लागले. लिलावतीचे लक्ष त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावमुद्रेकडेच लागलेले होते. कागद वाचतांना त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा दिसल्या की तिच्या काळजात धस्स होत होते. महाराज मात्र आपल्याच तंद्रीत वाचत होते, शब्दांचा अर्थ लावत होते.


    बऱ्याच वेळे नंतर शुभांगीच्या कुंडली मधील भविष्य महाराजांच्या डोळ्यासमोर अंधुकसे उभे राहिले होते. त्यांना ते पुरेपूर समजण्या साठी एक विधी करावा लागणार होता. त्या कुंडली नुसार पिशाच्च बाधे मुळे संसारात विघ्न दर्शवलेले होते. मात्र त्याचे कारण अस्पष्ट होते. कारण स्पष्ट झाल्या शिवाय उपाय करता येणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी पूजा विधी करण्या साठी मनाची तयारी केली. लिलावतीला काही सामान आणण्या साठी बाहेर पाठवले. 


    लीलावती सामान आणण्या साठी बाहेर जाताच महाराजांनी पूजाविधीसाठी कालीमातेची मूर्ती काढली. तिला धुऊन स्वच्छ केली, पुसून कोरडी केली. एका छोट्या चौरंगावर ती ठेवली. चार विटा मांडून यज्ञकुंड तयार केला. यज्ञात बारीक काटक्या टाकून मंत्र शक्तीने तो प्रज्वलित केला. कमंडलूत पाणीही भरून घेतले. तेवढ्यात सांगितलेले सर्व सामान घेउन लीलावती तिथे आली.


   लिलावतीने आणलेले पूजेचे सामान महाराजांनी स्वतःच्या ताब्यात घेतले. अभिमंत्रित केलेले जल चारही दिशांनी उडवले, खोली अभिमंत्रित करून घेतली. खोलीतले सर्व विजेचे दिवे मालवले. एका धातूच्या दिव्यात तूप घालून तो पेटवला. त्याच्या लालसर पिवळ्या प्रकाशाने खोली उजळून निघाली. महाराजांनी लीलावती साठी एक आसन दिले, तेही अभिमंत्रित केलेले होते. काही सूचना केल्या. मी सांगे पर्यंत काहीही बोलायचे नाही, कुठल्याही परिस्थितीत आसन सोडायचे नाही, इथे जे काही बघायला मिळेल त्याची वाच्यता कुठेही करायची नाही. अशा काही सूचना करून तिच्या आसना भोवती काळे तीळ घेऊन रांगोळी काढली आणि पुढील पूजा विधीला सुरुवात केली. 


    काळे तीळ, उडीद, लिंबू, तूप, लाल मिरची, काळे मिरे इत्यादी साहित्य जवळ घेतले. समोरील देवीच्या मूर्तीला अंघोळ घातली. यज्ञाकुंडात तुपाची आहुती टाकून मंत्र म्हणायला सुरुवात केली.....


   "ओ$$म, 

काली काली महाकाली कालिके पाप नाशिणीम्

सर्वत्र: मोक्ष दायिनीम् नारायणी नमोस्तुते" 


   अशा प्रकारे मंत्राचे उच्चारण करत महाराज देवीला अभिमंत्रित जलाने अभिषेक घालत होते. बराच वेळानंतर दुरून कुठून तरी आवाज आला, 

    

   "बालका, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. बोल काय समस्या आहे?" देवीचा आवाज आला.


   "माते, आमच्या कन्येच्या जन्मकुंडलीत दाखवल्या प्रमाणे संसारात थोडेसे विघ्न येऊ घातले आहे असे दिसते, तशा काही घटना घडताहेत. म्हणून आईच्या जीवाला काळजी वाटते आहे. माते, आम्ही तुला शरण आलो आहे, तिच्या जीवनातले दुःख दूर करावे. एवढीच आमची मागणी आहे." महाराजांनी स्पष्ट केले.


   देवी क्षणभर शांत राहीली. थोड्या वेळाने आवाज आला,....

     

    "बालक, जन्म कुंडलीत हस्तक्षेप करणे माझ्या हातात नाही. आपापल्या कर्मानुसार मनुष्य भोग भोगत असतो. त्यात बदल करणे शक्य नसते. काळजी करण्याचे काही कारण नाही. हे विघ्न फार मोठे किंवा नुकसान कारक नाही. तरीही तुला वाटच असेल तर त्या पिशाच्चाला विचारू शकतोस. त्यासाठीच्या मंत्रांनी पिशाच्च्याला आवाहन कर. त्या मंत्राचे उच्चारण कर."असे म्हणून आवाज बंद झाला. महाराजांनी पुन्हा यज्ञकुंडात समिधा टाकत मंत्रोच्चारण सुरू केले. 


    "ओ$$म! ऐं ह्रि$म ह्रि$म चामुंडायै वच्चै ओम स्वाहा!" असे म्हणत वेदीत पळीने तूप टाकले तसा वेदीत भडका उडाला. एका नंतर एक असे उडीद, मिरे, काळे तीळ, मिरची, इत्यादींची आहुती टाकत मंत्रोच्चारण सुरू होते. खोली मधील वातावरण गूढ, गंभीर आणि रहस्यमय बनत चालले होते.


    लीलावती निरागसपणे पहात बसली होती. महाराज मंत्रांचा उच्चार करत होते, यज्ञकुंडात आहुती टाकत होते. गूढ अशी रहस्यमयी शांतता तिथे पसरली होती. "कोण आहे ते? कशाला हा सारा खटाटोप करून आम्हाला त्रास देताय?" अचानक एक अस्पष्टसा परंतु क्रोधयुक्त आवाज तेथे उमटला. क्षणभरच महाराजांचे मंत्रोच्चारण मंद झाले पण लगेच स्वतःला सावरत आपले काम पुन्हा जसेच्या तसे सुरू ठेवले, किंबहुना आणखी जोरात सुरू केले.


    साधक आपले ऐकत नाहीसे बघून, आवाज जरा वाढवून धमकावणीचा सूर कानावर आला, "ताबडतोब बंद करा हा सारा खेळ. तुमचा हेतू भले काहीही असो, आम्ही आमचा मार्ग बदलणार नाही. या आमच्या मार्गात अडथळे आणण्याचे परिणाम वाईट होतील." आणि मोठ्याने विदारक असा हसण्याचा आवाज आला.


   "तू कोण आहेस? का असा आमच्या मुलीच्या मागे लागला आहेस आम्ही तुला काहीही त्रास देणार नाही. पण आमच्या मुलीच्या संसारात जे विघ्न येऊ घातले, ते निवारण्या साठी आम्हाला तुझ्याशी बोलणे भाग होते म्हणून हा सारा प्रकार करावा लागला." प्रथमच महाराज मंत्रोच्चारण थांबवून बोलले.


   "साधका, घाबरण्याचे काहीच कारण नाही. मी या झाडाला काहीही त्रास देणार नाही. माझी अपूर्ण इच्छा पूर्ण झाल्यावर या झाडाला सोडून देणार आहे. काळजी करू नकोस आणि मला थांबवण्याचा प्रयत्न करू नकोस. नसता झाडाला त्रास होईल." धमकावणी देत आवाज थांबला. 


    "तुझी कोणती इच्छा अपूर्ण आहे जी या मुलीद्वारे तू पूर्ण करू इच्छित आहेस?" महाराजांनी विचारले.


    "ती एक फार मोठी आणि भयानक कहाणी आहे. ऐकायचीय तुम्हाला? ऐका तर.." आणि ती सांगायला लागली......


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror